मी एका व्हीडीओमधे आणि आर्टीकलमधे म्हटलय की बऱ्याच पुरुषांना स्त्रीला सॅटीसफाय करता येत नाही आणि हे खरय कारण त्यासाठी आधी त्याला स्त्री कळावी लागते.. तिचा आदर करावा लागतो.. तिच्यावर प्रेम म्हणजे तिच्या मनावर प्रेम करायला लागतं पण बऱ्याचदा असं होत नाही.. याला अपवाद नक्कीच आहे.. काही पुरूष उत्तम रितीने (सर्वार्थाने ) स्त्रीला समाधानी करु शकतात..
तो व्हीडीओ माझ्या वाचकाने पाहिला आणि त्याचदरम्याने त्याची मैत्रीण म्हणाली , तुला सेक्स करता येत नाही याच एका कारणांमुळे त्याचा इगो दुखावला गेला.. ते वाक्य त्याने इतकं मनाला लावून घेतलं कि तो जवळपास वेडा झालाय.. त्यावर काम न करता किवा लैगिकतेचा अभ्यास न करता तो सॅटीसफॅक्षन चा विचार करु लागला आणि हे साफ चुकीचं आहे त्यामुळे तो माझ्याकडे काउंसीलींगला आला.. असा माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला नसेल.. प्रचंड प्रमाणात बडबड.. अतिशय हायपर.. अजिबात पेशंस नाहीत .. मी काय सांगतेय हे त्याला कळतच नव्हतं.. मी एमबीए केलय असही सांगत होता .. तुम्ही इंग्लिश बोलता ते कळत नाही असही म्हणत होता.. आणि प्रत्येक एका वाक्यानंतर मला विचारत होता , तिला सॅटीसफाय कसं करु सांगा.. त्याला रोमान्सशी काहीही देणंघेणं नव्हतं त्याला फोरप्ले हा शब्द माहीत नव्हता.. इंटरकोर्स न करताही फक्त रोमांस आणि फोरप्ले मधून स्त्रीला ऑर्गॅझम येउ शकतो हे तर अनेक पुरुषांना माहितच नसतं..स्त्रीला तर या सगळ्या गोष्टी हव्या असतात.. यालाही अपवाद आहे बरं.. काही स्त्रीयांना यातला गंधही नसतो .. त्यांना जाणूनही घ्यायचे नसते.. त्यांना सगळ्यातलं सगळं कळतं तसच लैगिकतेतलही कळतं असा आविर्भाव असतो.. त्यांना त्यावर चर्चाही करायची नसते.. हे एक टोक कि ते दुसरं टोक.. प्रत्येक व्यक्तीगणिक लैगिकता आणि त्याची परिमाणं बदलतात.. गणित विषयासारखे त्याला ठोकताळे नाहीत.. त्या व्यक्तीला असं झालय की ही स्त्री मला कमजोर सनजते.. .मी स्प्रे वापरु का मॅडम ??..पॉर्न मधे असं दाखवतात.. ते तासभर करतात.. अशा अनेक गोष्टीनी डोक्यात थैमान घातलेले असताना तो स्थिर कसा राहील ?? आणि तो आनंद कसा घेइल आणि देइल.. त्याला अजिबात अभ्यास करायचा नाही.. त्याचं त्या स्त्रीवर प्रेमही नाही.. फक्त शरीरसुखासाठी जवळ जाणाऱ्या व्यक्तीचं हे असं होतं..
लैगिकतेत पीएचडी ( pure Happiness in Dedication ) मिळवायची असेल तर या सगळ्या गोष्टी खुप महत्वाच्या आहेत.. जोपर्यंत मनाने आपण एकरूप होत नाही तोपर्यंत शरीर साथ देत नाही आणि सादही घालत नाही.. अतिशय सुंदर क्षणांना या अशा माणसानी रौद्र रुप देउन ठेवलय .. व्यक्ती ला जाणून घेतलं कि त्याच्या आवडीनिवडी कळतात.. त्यातून तिचा लैगिकतेचा कल समजतो.. लैगिकतेत त्या व्यक्तीचा इंटरेस्ट कशात आहे हे कळतं.. सगळ्यात शेवटी येतं ते ॲक्चुअल इंटरकोर्स असतो..ज्यात कमी समाधान असतं आणि फोरप्ले रोमान्स मधे जास्त आनंद असतो.. इथेही काही जणांचं उलट असतं.. कोणाची आवड कशात असेल त्यावरून त्या व्यक्तीचं त्या आयुष्यातील स्थान ठरतं.. मी चार वेळा करतो आणि १० वेळा करतो अशा बढाया मारुन स्त्रीला इंप्रेस करणारे पुरूषही आहेत जे बऱ्याचदा स्त्रीला आवडत नाहीत.. कारण त्यांच्या आकड्यावर स्त्रीचं समाधान नसतं.. मी अर्धा तास करतो / एक तास करतो अशा बढाया मारणारेही अनेक आहेत.. प्रत्यक्षात काहीही नसतं.. गोळ्या घेउन स्त्रीला खुश करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असतो.. माझं लिंग मोठं आहे मग मी भारी पण व्हजायनाच्या दिढ दोन इंचावर सेंसेशन असतं याचा अभ्यास कोण करणार ??.. शिक्षण महत्त्वाचे का आहे तर यासाठी.. बढाया मारणाऱ्या व्यक्तीवर विश्वास न ठेवता प्रत्येकाच्या शरीराची गरज ओळखा आणि त्यानुसार त्या व्यक्तीला काय हवय हे जाणून घेउन त्याच्या तृप्तिचा आनंद लुटा.. सर्वोत्तम सुख फार कमी जणाना द्यायला जमतं .. जे तो घ्यायला जातो त्याला त्यातील समाधीस्थ स्थिती अनुभवता येणार नाही.. त्यामुळे सुख घेण्यापेक्षा देण्यात आनंद जास्त आहे.. खरं तर हा विषय वैचारिक लेव्हल उच्च असलेल्याना कळेल.. कारण लैगिकतेची व्याप्ती खुप मोठी आहे..
( तळटिप.. स्त्रीला उपभोगाची वस्तु न समजता निसर्गाने कोरलेलं हे सुंदर शिल्प आहे आणि त्याचा हळुवार आस्वाद घ्यायचा असतो.. बऱ्याचदा तर तो दुरुनही घेता येतो..)
सोच बदलो.
.#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist