नांदेड –
जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा नांदेड महानगरच्या वतीने नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सेवा सप्ताहात सत्तर विविध कार्यक्रम घेण्यात येत असून मध्यवर्ती बसस्थानक येथे सेवा सप्ताह प्रभारी ॲड. दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या महा स्वच्छता अभियानाचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या हस्ते करण्यात आला असून यावेळी सर्व भाजप सदस्यांनी प्लास्टिक मुक्तीचा संकल्प केला.
स्वच्छता अभियानाचे हे सहावे वर्ष असून यावर्षी शंभर पेक्षा जास्त भाजप सदस्य तसेच मनपा व एसटी महामंडळाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी बस स्थानकाचा परिसर स्वच्छ केला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटन सरचिटणीस विजय गंभीरे हे होते . याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सुशीलकुमार चव्हाण,
शितल भालके, जिल्हा चिटणीस शततारका पांढरे, जिल्हा चिटणीस मनोज जाधव,शततारका पांढरे,चंचलसिंघ जट,सिद्धार्थ धुतराज, मनोज यादव ,प्रसिद्धीप्रमुख धीरज स्वामी, कार्यालय प्रमुख कुणाल गजभारे, मंडल अध्यक्ष आशीष नेरलकर, सूर्यकांत कदम,हरभजन पुजारी,
सोशल मीडियाचे मराठवाड़ा सहसंयोजक बाळू लोंढे,
, जिल्हा संयोजक राज यादव,विशाल शुक्ला, सनी बिसेन ,
युवती आघाडी प्रमुख महादेवी मठपती, विधी आघाडीचे अध्यक्ष ॲड. संभाजीराव देशमुख,गुरप्रीतसिंघ सोखी यांची प्रमुख उपस्थिती होती.
युवा मोर्चाचे श्रीराज चक्रवार, निखिलेश देशमुख, सुनील पाटील, पवन यादव,संदीप पावडे, गौरव कुंटूरकर, मनोज ठाकरे,आनंद बामलवा, यांनी सफाई कामगारांचा मास्क व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सफाई अभियानामध्ये अनिल गाजुला,रुपेश व्यास,अनिल भालेराव,अभिजीत जोशी,
गजानन जोशी,चंदकान्त कोकाटे, दत्तात्रय मुड़कर, जनार्धन वाकोडिकर, सिद्धार्थ मातोडीकर, माधव वाघमारे उमरजकर,
बालाजी पुयड, सतीश पुयड यांच्यासह अनेक भाजपा सदस्यांनी सहभाग घेतला. स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या सर्व सदस्यांना समाजसेवक वसीमभाई बाबुशेठ यांच्यातर्फे हातमोजे व मुखपट्टी देण्यात आली. आशुतोष जोशी यांनी सर्वांच्या चहा फराळाची केली. स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी हनुमान पेठ मंडळ उपाध्यक्ष राजेशसिंह ठाकूर, वेदांत भुतडा, मंडल चिटणीस राहुल बनसोडे यांनी परिश्रम घेतले. एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक व्यवहारे, मनपाचे सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक, स्वच्छता निरीक्षक सरोदे व राजेंद्र गंदमवार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल संयोजक दिलीप ठाकूर यांनी आभार मानले.