माजी सैनिकांची नगरविकास मंत्र्याकडे मागणी
लोहा ;
लोहा तालुक्यातील जानापुरी येथील संभाजी कदम हा सैनिक पाकिस्तानच्या चकमकीत शहीद झाला आहे. त्यामुळे लोहा येथील उपरुग्णालयात शहीद संभाजी कदम यांचे नाव देण्याची माजी सैनिकांच्या वतीने नगर पालिकेकडे मागणी करण्यात आले होती. येथील नगर पालिका ही भाजपच्या ताब्यात असून नगरपालिकेवर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व आहे. नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी चिखलीकर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना खुश करण्यासाठी या रुग्णालयात त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पाटील चिखलीकर यांचे नाव देण्याचा ठराव पास केला आहे तो ठराव रद्द करण्यात यावा अशी मागणी माजी सैनिकांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
. लोहा येथिल नुकतीच लोकार्पन करण्यात आलेले उपजिल्हा रुग्णालयास शहिद संभाजी कदम यांचे नाव देण्याची मागणी गेल्या चार महिण्यापासुन माजी सैनिक करत आहेत.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,अरोग्य मंत्री राजेश टोपे व संबधीत मंत्री आमदार यांच्याकडे या संदर्भात माजी सैनिकांनी मागणी केली आहे. शहिद संभाजी कदम यांचे नाव देण्यासाठी विविध संघटनेकडुन मागणी होत असताना येथिल नगराध्यक्ष यांनी सत्तेचा गैरवापर करुन गोविंदराव पाटील चिखलीकर यांचे या रुग्णालयास नाव देणाचा ठराव घेतला आहे.त्यामुळे माजी सैनिकांत संताप निर्माण झाला असुन हा घेण्यात आलेला ठराव रद्द करावा या मागणीची निवेदन माजी सैनिकांनी एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
या निवेदनावर माजी सैनिक बालाजी चुकलवाड(जिल्हा आधक्षे),राम सूर्यवंशी,बापूराव कल्याणकर, विठ्ठलराव वाघमारे ,माणिकराव देवकते, बळीराम जोंधळे, शाहूजी तिडके, लक्ष्मण बनसोडे, एम.जी. शेख, यु.जे. शेंडगे, व्ही.टी. गारोळे,जि.पी.पेठकर, गणेश बारोळे, आनंदा नवघरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.