*कंधार : प्रतिनिधी संतोष कांबळे*
येथील प्रसिद्ध सुफी संत हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम यांच्या दि १७ रोजी सुरू होणाऱ्या ७१० व्या उर्सा निमित्त स्थापन करण्यात आलेल्या उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी माजी खासदार तथा आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे खंदे समर्थक माजी नगराध्यक्ष मोहम्मद जफरोद्दिन बाहोद्दिन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दर्गाचे सज्जादा सय्यद शाह मुर्तुजा मोहियोद्दिन यांच्या संमती पत्राने ऊर्स कमिटी जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी मोहम्मद जफरोद्दिन, उपाध्यक्ष अरशद खान मोहम्मद खान, सचिव समीर चाऊस, सह सचिव सय्यद अहेमद अली गौस अली, कोषाध्यक्ष सय्यद अमजत इनामदार तर सदस्य म्हणून शेर मोहम्मद हकीम साम, मोहम्मद हमेदोदिन मोहम्मद नजीरोद्दीन, मिर्झा सिकंदर बेग, शब्बीर खान महेमूद खान, गुलाम गौस चुनू मास्टर ,हाजी मोईन शेखरजी बागवान, शेख अलाउद्दीन चौधरी, यांची निवड करण्यात आली असून दि १७ रोजी संदल मिरवणूक दि १८ रोजी दुपारी ३ वाजता कुस्ती तर सायंकाळी कव्वालीचा कार्यक्रम आणि १९ रोजी सायंकाळी मुशायरा आयोजित करण्यात आले आहे.
*कंधार उर्स कमिटीच्या वतीने पत्रकारांचा सन्मान*
उर्स कमिटीच्या वतीने माजी खासदार तथा आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे खंदे समर्थक माजी नगराध्यक्ष मोहम्मद जफरोद्दिन बाहोद्दिन यांच्यावतीने दर्पण दिनाचे औचित्य साधून आ. चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकारांचा पुष्पहार पेन आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला यावेळी दर्गा कमिटीचे पदाधिकारी आणि माजी नगराध्यक्षा प्रतिनिधी चेतन केंद्रे, माजी नगरसेवक प्रतिनिधी शेख आसेफ, मधुकर डांगे, सतीश कांबळे, घुमे आदींची उपस्थिती होती.