कंधार प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे आज सकाळी छातीसगड येथील निर्भीड पत्रकार स्वर्गीय मुकेश चंद्रकांर यांची अमानुष , निर्दयी हत्या नक्षलवादी यांनी केली आहे.
मुकेश चंद्रकांर यांनी स्थानिक श्यासकीय निधी चे घोटाळे ही बाहेर काढले होते. त्यांनी सिआरपीएफ जवान यांना नक्षली कटातून वाचवले होते असे समाज माध्यमातून ऐकवयास मिळते.या घटनेचा निषेध म्हणून राज्यात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून जयमहाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन आहे.
संघटने निवेदन देते वेळी त्यात हे नमूद केले आहे कि, राज्यात अनेक निर्भीड पत्रकार अहेत. ते वाळू माफिया, गौण खनिज, व इतर काळ्या धंद्या बदल आपल्याला लेखणीतून व पत्रकारितेतून जणजागृती करतात. त्याचा राग प्रशासन व लोकप्रतिनिधी ही करतात आणि त्यांच्या रोष्याचे बळी राज्यात पत्रकार पडतात. या साठी संवेदनशील घटनेची बातमी मिळवण्यासाठी अनेकांना जीव धोक्यात घालून काम करावे लागते. त्या साठी राज्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील पत्रकाराना हवे तेव्हा, त्यांनी संरक्षण मागितले तर देण्यात यावे असेही नमूद केले आहे .
राज्यातील,पत्रकार अत्याचार विरोधी कायद्याने सर्वाना संरक्षण दयावे. पत्रकारांना मुक्तपने समाज उपोयोगी
काम करु द्यावे.असे ही त्यांनी दिलेल्या निवेदनत नमूद केले आहे. सदरील निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष मयूर कांबळे, सचिव राजरत्न गायकवाड, सहसचिव शुभम केंद्रे, कार्याध्यक्ष रमेशसिंग ठाकूर, प्रसिद्धी प्रमुख नर्सिंग पेठकर यांच्या स्वाक्षऱ्या अहेत. सदरील निवेदन हे राज्याचे राज्यपाल, नांदेड जिल्हाधिकारी, नांदेड, पोलीस निरीक्षक कंधार यांना निवेदनाच्या प्रति देण्यात आल्या अहेत.