अहमदपूर ( प्रतिनिधी ) नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि 31 डिसें 24 रोजी सायंकाळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती , पुरोगामी साहित्य परीषद ,संवाद ग्रुप आणि मिथुन चक्रवर्ती क्लब अहमदपूर यांच्यावतीने दारू सोडा दूध प्या हा संदेश समाजाला देण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख हे होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चांदबा पाटील , मसाप केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मोहीब कादरी आणि मराठी चित्रपट अभिनेता रुद्रा मुरकुटे हे होते.
याप्रसंगी शिवाजीराव देशमुख यांनी असे सांगितले की दारू ही वेभीचाराची जननी आहे. दारू पिणारा माणूस कोणतेही वाईट काम करायला मागे पुढे बघत नाही. म्हणून दारू मुक्त समाज निर्माण होणे ही काळाची गरज आहे .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुखपृष्ठकार चंद्रशेखर भालेराव यांनी केले.
या कार्यक्रमासोबतच कविवर्य अनंत काशीकर यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते . यात
शाहीर सुभाष साबळे, बी व्ही मुंडे, अनंत काशीकर, गारपीटकार प्रा. भगवान आमलापुरे, लोकशाहीकार एन डी राठोड,
आणि डॉ शादुल्ला पठाण यांनी एकापेक्षा एक सरस कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. शाहीर सुभाष साबळे यांनी माणसा इथे मी तुझे गीत गावे
या कवितेचे पहाडी आवाजात गायन केले. कवी बी व्ही मुंडे यांनी शब्दांनो
ही कविता सादर केली तर अनंत काशीकर यांनी जुळणी ही कविता सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.
संविधानाचा जागल्या ही कविता प्रा. भगवान अमलापुरे यांनी सादर केली . डॉक्टर शादूला पठाण यांनी सर्वधर्मसमभाव ही कविता सादर करून प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली. कवी संमेलनाची सुरुवात दुध पिऊन करण्यात आली.कवी संमेलनाचा समारोप एन डी राठोड यांच्या मायमाऊली या कवितेने करण्यात आला.
कवी संमेलनाचे सूत्रसंचालन एन डी राठोड यांनी केले . आभार प्रा भगवान आमलापुरे यांनी मानले. पत्रकार बालाजी पारेकर आणि मित्र मंडळ उपस्थित होते.यशस्वीतेसाठी नाजीमभाई आणि मित्र परिवाराने परिश्रम घेतले.