प्रत्येक व्यक्तीला मोबाईल हवा आहे. मोबाईल हातात आल्यानंतर त्याच्यापासून असणारे दुष्परिणाम काय आहेत.यांची जाणीव जागृती असावी.
कारण सध्या अनेक वाईट घटनाचे मूळ मोबाईल मध्ये आहे. परंतु चांगले ही आहे. रेडिओ वरील गाणी ऐकणे. पैसे घेणे-देणे,
मनोरंजन करणे,छायाचित्रे काढणे. रेकार्डिग करणे,पुस्तके वाचणे,तिकीट बुक करणे,वेळ पाहणे,बेरीज वजाबाकी करणे. इतर अनेक गोष्टीही मोबाईलवर केल्या जातात. लहानांपासून थोरांपर्यंत मोबाईलचा लळा सर्वांनाच लागलेला आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको? परंतु सध्या मोबाईलचा अतिरेक होत आहे. याची मनाला खंत वाटते. मोबाईल हे सध्या अनेक जणांचे खरोखर व्यसन झालेले आहे. शासकीय कार्यालये, वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालये सरकारी ऑफिस या ठिकाणी मोबाईल वापरले जात होते. आता मात्र सर्व सामान्य व्यक्ती सर्रास मोबाईल वापरत आहेत. परंतु आता अक्षरश: त्याचा स्फोट झाला आहे. एक व्यक्ती दोन मोबाईल दोन ते तीन सिम कार्ड सध्या वापरत आहेत. मोबाईल पासून असणारे फायदे भरपूर आहेत. नाही घेतले तर नुकसान ही आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या सुखासाठी काही गोष्टी करतो.परंतु त्या सुखामध्ये आता दु:ख ही दिसत आहे.
तरुण-तरुणीचा तर मोबाईल श्वासच झाला आहे. मोबाईल वेडे म्हणून काही जणांची गणती त्यामध्ये होत आहे.मोबाईल बाजारात आला आणि जीवनातले सुख कमी झाले आहे. काही लोकांचे म्हणणे आहे. खिशात मोबाईल आहे की नाही? हे खात्री करण्यासाठी दिवसभरामध्ये कमीत कमी दहा ते बारा वेळा हात घालून मोबाईल पाहवा लागतो.घरातील सगळ्याच व्यक्तींना मोबाईल हवा आहे.अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार मोबाईल तुम्ही घ्या.आमचं काही म्हणणे नाही.मानवी जीवनामध्ये विश्रांती आहे हे बरेच जण आता विसरून गेले आहेत.मोबाईल मध्ये घड्याळ आले आणि आपले हाताला घड्याळा बांधायची आवश्यकता राहिली नाही. त्यामुळे घड्याळ दुरुस्त करणाऱ्या व्यावसायिका वर उपासमारीची वेळ आली हे कटू सत्य आहे.तसेच कॅल्क्युलेटर आला.गणिती हिशोब करण्याची बौद्धिक क्षमता अनेक जणांची कमी झाली.कृत्रिम बुद्धिमत्ता तयार झाल्यासारखे आता वाटत आहे. त्यामुळे हे खरोखरच आता कलियुग नाही तर मोबाईल युग अवतरले आहे का?
असे आपल्याला स्पष्ट म्हणता येईल. प्रसार माध्यमाची आवश्यकता का भासली तर सीमेवर असणारा सैनिक त्यांच्याशी दोन गोष्टी बोलता याव्यात. तिकडचा संदेश इकडे आणि इकडचा संदेश तिकडे पोहोचता यावा म्हणून प्रसार माध्यमाची निर्मिती झाली. दळणवळणाच्या साधनातून सुखदुःखाच्या गोष्टी कळत होत्या; परंतु आता मोबाईल मुळे अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी वाद विवाद हे फार वाढलेले आहे.थट्टा मस्करी मधून एकमेकांची रेकॉर्डिंग करून पुढील व्यक्तीला दाखविण्यात येत आहे. त्यामुळे मोबाईल शाप आहे की वरदान आहे.हे कळायला तयार नाही. प्रत्येक व्यक्तीजवळ मोबाईल असावा अशी मानसिकता तयार झाली. तसेच शासनाच्या विविध योजनेसाठी मोबाईल नंबर द्यावे लागत आहे. आपली आता बँकेतील व्यवहार आपण मोबाईल वरून करू शकतो. रिझर्वेशन, शाळा महाविद्यालयातील फी ,लाईट बिल आपण आता घरूनच भरू शकतो.त्यामुळे मोबाईलला शाप आहे असे म्हणता येणार नाही. क्षणार्धात तुम्हाला मोबाईल मधून ढगाळ वातावरण, पिकांची माहिती, वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, एकादशी, अमावस्या, पौर्णिमा कधी आहेत. कोणत्या दिवशी आहेत हे समजते.त्याच्यामुळे कॅलेंडर घेणा-यांची संख्या कमी झाली. कॅलेंडर विक्रीचा खप कमी झाला आहे. सर्वांना मी सांगू इच्छितो की मोबाईल पासून फायदे करून घेतले तर फायदेच फायदे आहेत. आपलं वय,आपलं काम,कामाचा वेग या सगळ्या गोष्टीचा विचार करून मोबाईल वापरल्यास खरोखर हे मोबाईल वरदान आहे.
असे म्हटले तर हरकत नाही. मोबाईलच्या माध्यमातून अनेक लोकांचा बेरोजगार वाढलेला आहे. दुसऱ्या बाजूला अनेक व्यवसायिकांचं यामधून नुकसान ही झालेले आहे. वर्तमानपत्र मोबाईल मुळे प्रत्यक्ष विकले जात नाहीत. ती पूर्णपणे बंद ही झाली नाहीत.परंतु मोबाईल वरून आपल्याला वृत्तपत्रे वाचन करता येतात. खेळाचे सामने कोणत्या ठिकाणी चालू आहेत. ते प्रत्यक्ष आपण टीव्ही वरून न पाहता मोबाईल वरूनच जास्त पाहू शकतो. त्यामुळे मोबाईल युगाकडे आपली वाटचाल चालू झालेली आहे.मोबाईल निरक्षर,साक्षर व्यक्तीकडे दोघाकडे आहे. आजी,आजोबा सह 99% कर्मचाऱ्यांकडे मोबाईल आहेत. त्यांचे ग्रुप तयार केले जात आहेत. तरुण-तरुणीचा ग्रुप वेगळाच आहे.सेवानिवृत झालेल्या लोकांचा मोबाईल ग्रुप वेगळाच आहे. एखाद्या टूरला सहलीला जायचं असल्यास सगळ्यांचे नंबर एकत्रित करून ग्रुप काढून ग्रुप वरून गाडी कुठे थांबणार? नाश्ता कुठे केला जाईल? सायंकाळचा मुक्काम कुठे आहे ?
हे मोबाईल वरून आपण प्रत्यक्ष सांगू शकतो.आणखी मोबाईल बद्दल आपला सांगायचे असेल तर शालेय जीवनातील सहल काढल्यानंतर मोबाईल वरून ऐतिहासिक ठिकाणे आहेत.त्याचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे. याची पूर्ण माहिती मोबाईल वरून आपल्याला कळत आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मोबाईलचा फायदा म्हणजे फोटो काढता येणे.
सहलीला गेल्यानंतर विद्यार्थी मनमोकळेपणाने समुद्राच्या काठावर लाटेजवळ उभे राहून शेकडो फोटो काढत आहेत. स्टेटसला ठेवत आहेत. इतरांना फोटो फॉरवर्ड करत आहेत. त्यामुळे मोबाईलने तरूणांना भरपूर आनंद दिला आहे.एखाद्या मुलीला पाहण्यासाठी जायचे असल्यास ती मुलगी कशी आहे? रंग कसा आहे?
हे मोबाईलवर फोटो पाठवावे. म्हटल्याबरोबर मोबाईलवर फोटो येत आहे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी न जाता आपण घरीच बसून त्या तरुणीचा फोटो पाहत आहोत. किती सुधारणा झाल्या यावरून आपल्या लक्षात येते. शाळेला उद्या सुट्टी आहे का? हे शाळेच्या ग्रुप वर टाकल्याबरोबर हजारो विद्यार्थ्यापर्यंत एका क्षणात उद्याची ताजी बातमी आपल्याला कळते. म्हणून खरोखरच हे आता मोबाईल युग अवतरले आहे. खेड्यापाड्यातून, वाड्या वस्तीवरून, शाळा महाविद्यालयातून छोट्या छोट्या मालिका दिग्दर्शक दाखवत आहेत. ते सगळं मोबाईल वरून पाहता येत आहे. मोबाईल मुळे चित्रपट गृहाकडे जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. कारण तीन तास तिथं बसून राहण्यापेक्षा मोबाईल वरूनच आपल्याला तो चित्रपट आपल्या ऑफिसमध्ये किंवा घरी फावल्या वेळात पाहता येतो.म्हणून मोबाईल खरोखरच अनेक जणाला वरदानच आहे. मोबाईल वरून आपण जगातील वेगवेगळ्या देशातील व्यवसायिकाशी संपर्क करू शकतो. आपल्या भाषेतून आपण टाईप करून पेपरवरून वेगवेगळे लेख देऊ शकतो. मोबाईल वरून व्हॉइस रेकॉर्डिंग करून पुन्हा पुन्हा ते आपण ऐकू शकतो. म्हणून मोबाईल युग अवतरले. अनेक जण मोबाईल वरून वेगवेगळे जुगार खेळून वेगवेगळ्या पद्धतीने श्रीमंत होत आहेत. जाहिराती करून आर्थिक सुबत्ता वाढवत आहेत. दुसऱ्या बाजूला मोबाईल मुळे पैसे सुद्धा आपले खात्या तून जात आहेत.
पुढील व्यक्तीला ओ, टी, पी दिल्यानंतर आपली खात्रीने काम होत आहे हे भी येथे आवर्जून सांगावे वाटते. या मोबाईलने अनेक लोकांची व्यवसाय बंद पाडले आहेत.
तसेच या मोबाईल मधून अनेक जण प्रगतीच्या शिखरावर सुद्धा पोहोचले आहेत. म्हणून मोबाईलचा जन्म मानवी कल्याणासाठी झाला हे मानवी कल्याण शाबूत राहण्यासाठी त्याचा गैरवापर आपण करू नये. मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करावा. मोबाईल कंपन्यांनी ही मानवतावादी धोरण ठेवून होता होईल तेवढं चांगल्या पद्धतीने माहिती पुरवावी. अनेक प्रलोभने दाखवून ग्राहकाला डाटा वाजवीपेक्षा जास्त झाल्यामुळे मानव बिघडत आहेत. मोबाईलचा एकंदरीत विचार केल्यास मोबाईल कसा वापरायचा हे प्रत्येकाच्या गरजेनुसार आहे. कोणत्याही वस्तूला फायदा आणि तोटा असतोच तो कसा करून घ्यायचा हे आपल्या प्रत्येकावर अवलंबून आहे.म्हणून शक्यतो तरुण-तरुणींनी मोबाईलचा वापर विधायक कार्यासाठी वापरावा.
वाईट प्रवृत्तीकडे नेण्यासाठी मोबाईलचा गैरवापर करू नये.
जर असा गैरवापर दिवसेंदिवस वाढायला लागला तर मानवी संस्कृती, नैतिक मूल्ये यांचा एके दिवशी स्फोट होईल. आपण सर्व मोबाईलवर ढकलून हे चालणार नाही. आपण भी तेवढेच जबाबदार आहोत.
हे या ठिकाणी नमूद करावे वाटते. अनेक तरुण-तरुणी मोबाईलच्या आहारी जाऊन निद्रा नाश करून घेत आहेत.मोबाईलच्या हाटापायी अनेक जणांचे जीव जात आहेत. आत्महत्या करत आहेत. काही जण मोबाईल शिवाय जगू शकत नाहीत. पाण्यातून बाहेर काढलेले मासे कशी धडपड करतात. तशीच धडपड काही जणांची झाली आहे.असं जर हे चालू राहिलं तर मोबाईलचे बळी म्हणून अपमान होईल. मोबाईल बद्दल डोक्यावर परिणाम होणे, मानसिक संतुलन बिघडणे,आपला सांस्कृतिक कार्यक्रम किती व्यक्तींनी पाहिला. आपल्याला किती व्यक्तीने लाईक केले. हे लोक ताबडतोब पाहत आहेत. जर नाही पाहिले कोणी तर अंगाला दरदरून घाम येत आहे हे या ठिकाणी मला सांगावे वाटते. आज एखाद्याकडे मोबाईल नसेल तर समाजामध्ये त्याची थट्टा केली जात आहे.
कोणत्याही कामाला मोबाईल नंबर आवश्यक आहे. त्यासाठी धरलं तर चावते. सोडलं तर पळते अशी अवस्था या मोबाईल मुळे झालेली आहे म्हणून सज्जनहो…
मोबाईल वापरण्यासाठीअतिशय चांगला आहे.स्पर्धा परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना खरोखर वरदान आहे. गुगल वरून तुम्ही आज कितीतरी माहिती घेऊ शकता ? ती साठवू शकता. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून तुम्ही अधिकारी होऊ शकता. फोन पे,गुगल पे करण्याची सोय झाल्यामुळे हजारो किलोमीटर आपल्याला जाण्याची गरज नाही. तत्काळ हे पैसे आपल्या मुला-मुलीच्या, पत्नीच्या किंवा एखाद्या व्यवसायिकाच्या नावावर जमा होत आहेत. म्हणून सर्वांनी मोबाईलचा चांगलाच वापर करावा म्हणूनच मी म्हणतो हे मोबाईल युग अवतरले आहे. आज पर्यंत मोबाईल होता असे नाही. फोनवरून आपण एकमेकाला बोलू शकत होतो. परंतु आता मोबाईल येऊन सुद्धा फार डोकेदुखी ,कंबर दुखी, पाठीचा कणा दुखणे, डोळे बारीक होणे.सारखे मोबाईल पाहून ताणतणाव येणे. अशा अनेक गोष्टी मोबाईल मुळे घडत आहेत.त्याचे परिणाम आता काही जणाला जाणवत आहेत. कोरोना काळामध्ये मोबाईल मुळे काही गोष्टी चांगल्या झाले असल्या तरीही अनेक गोष्टीचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम झालेले आहे.अनेक तरुण-तरुणी अश्लील चित्र पाहून वाईट कृत्य करत आहेत.ते आता कळायला लागली आहेत. म्हणून प्रत्येक पालकांनी आपापल्या पाल्यावर चांगले संस्कार करावेत. मोबाईल वापरण्याच्या पद्धती सांगाव्यात.मोबाईल विद्यार्थ्यांचा हातात असावा हे आम्हाला मान्य आहे. परंतु त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी मोबाईल हे जनजागृती करीत आहोत. रील्स, मालिका, खेळाचे सामने, प्रबोधनात्मक चित्रपट दाखवावे.भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, ही अपेक्षा..*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत* अध्यक्ष: विठू माऊली प्रतिष्ठान
खैरकावाडी ता. मुखेड