शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांसह पालकांचा सहलीत समावेश- सौ.रूचिरा बेटकर

 

नांदेड (प्रतिनिधी)- शिक्षक -विद्यार्थी -पालक यांच्यात सुसंवाद घडून आपसातील आंतरक्रिया दृढ होण्यासाठी शैक्षणिक सहलीमध्ये महिला पालकांचाही समावेश असावा. म्हणून या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक 5 जानेवारी 2025 वार रविवार रोजी सॅटेलाइट डिजिटल पब्लिक स्कूल गणेश नगर रोड,नांदेड. येथील मुख्याध्यापिका सौ.रूचिरा बेटकर यांनी त्यांच्या शाळेची सहल वारंगा गार्डन येथे महिला पालकांसह आयोजित केले होती. तिथे महिला पालकांचे विविध खेळ घेण्यात आले. कु.भाग्यश्री हटकर, सौ.अश्विनी काकडे, सौ.अंजली भदर्गे आणि सौ. गोवंदे या विजेत्या महिला पालकांना
बक्षीस रूपी भेटवस्तू देण्यात आले.

शालेय शिक्षण घेत असताना शालेय सहल हा उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये राबवला जातो. पण यात काहीतरी नवीन्य यावे म्हणून या शाळेने महिला पालकांसह सहलीचे आयोजन केले आहे. क्षेत्रभेट असो वा शालेय सहल यातून शिक्षक- विद्यार्थी पालक यांच्यात उत्तम अशी अंतरक्रिया घडून यावी म्हणून प्रत्येक वर्षी अश्याच पद्धतीने सहलीचे आयोजन करण्यात येते. याचबरोबर सहलीमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना योग्य असे संगोपना संबंधित मार्गदर्शन करण्यात आले.

 

मा.नितीन सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल घेऊन जाण्यात आली. शाळेतील शिक्षिका कु.सुनिता गायकवाड, सौ. कांचन बहादुरे , सौ. सुरेखा नरनवरे , सौ.भाग्यश्री बोंदली, आणि इतर पालकांच्या सहकाऱ्यांनी ही सहल यशस्वीरित्या पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *