महाराणा प्रताप चौकात सार्वजनिक शौचालय बांधण्याची गंगाधर काळेकर यांची मागणी

कंधार ; प्रतिनिधी

शहरातील महत्वाचे असलले ठिकाण म्हणून महाराणा प्रताप चौका ची ओळख आहे . अतिवर्दळीच असलेल्या या ठिकाणी शौचालय नसल्या कारणाने लघुशंका व शौचालयाची मोठी अडचण होत असल्याने नगर पालीका प्रशासनाने तात्काळ परिसरात शौचालय बांधण्याची मागणी मुख्याधिकारी कंधार यांना सामाजिक कार्यकर्ता
गंगाधर सोमनाथ काळेकर यांनी आज दि १० जानेवारी रोजी केली .

कंधार हे एक ऐतिहासिक शहर असुन शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या महाराणा प्रताप चौकात सार्वजनिक शौचालय बांधणे गरजेचे आहे. दररोज शहरात ग्रामीण भागातुन विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, प्रवासी व पर्यटकांची वर्दळ असते व दर सोमवारी आठवडी बाजार असल्याने याठिकाणी मोठा बाजार भरतो शौचालय नसल्या कारणाने लघुशंका व शौचालयाची मोठी अडचण निर्माण होत आहे व पुरुष उघड्यावर लघुशंका करतात त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. आणि महिलाना या अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे शौचालय होणे गरजेचे आहे. अशी मागणी येथील जेष्ठ नागरिक, महिला वर्ग, ग्रामीण भागातील विद्यार्थी, पर्यटकांकडुन अनेक वेळा झालेली आहे.

मुख्याधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नगर परिषद कार्यालय,कंधार यांनी शहरातील महाराणा प्रताप चौकाच्या आजु-बाजुला शौचालय बांधुन देऊन नागरिकांची होणारी अडचण दुरु करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता
गंगाधर सोमनाथ काळेकर रा. म. फुले हा. सोसायटी, कंधार केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *