शत प्रतिशत भाजपासाठी सदस्य नोंदणी करा.. -समन्वय बैठकीत संजय कौडगे यांचे आवाहन

 

कंधार ; प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी संघटन पर्व निमित्त सदस्यता नोंदणी अभियानाच्या अनुषंगाने कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाची समन्वय बैठक कंधार येथे घेण्यात आली या बैठकीत मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांनी कंधार लोहा विधानसभा मतदारसंघात शतप्रतिशत भाजपमय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबवावे असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

विधानसभेतील अभूतपूर्व व यशानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणामध्ये चालू असून कंधार येथे दि १० जानेवारी रोजी नगरेश्वर मंदिर मंगल कार्यालय येथे लोहा कंधार विधानसभेचे जनता पार्टी मध्ये नव्याने प्रवेश केलेले व जुने पदाधिकारी यांची समन्वय बैठक घेण्यात आली यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अमर राजूरकर ,विभागीय संघटमंत्री संजय भाऊ कौडगे , प्रदेश चिटणीस देवीदास भाऊ राठोड, राष्ट्रीय परिषदेचे सदस्य तुकाराम वारकड, भाजपाचे ज्येष्ठ केरबा बिडवई, माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी,यांची प्रमुख उपस्थिती होती  .

यावेळी संघटन मंत्री संजय कौडगे यांनी बूथ स्तरापर्यंत सदस्य नोंदणी करावी हे अभियान मोठ्या व्यापक प्रमाणामध्ये राबवावे असे त्यांनी यावेळेस सांगितले, यावेळी आपल्या मनोगतामध्ये प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अमर राजूरकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढवणार असून सर्व निवडणूका जिकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी भाजपामध्ये नव्याने प्रवेश केलेले चंद्रसेन पाटील सुरनर ,बालाजी पांडागळे ,शरद पवार ,गजानन सूर्यवंशी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे लोहा कंधार विधानसभेतील बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख प्रमुख यांच्या सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर नव्याने प्रवेश केलेले सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी या बैठकीचे प्रस्ताविक भाजपचे तालुकाध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार यांनी केले तर आभार जिल्हा उपाध्यक्ष भगवान राठोड यांनी मानले

जिल्हा सरचिटणीस चित्ररेखाताई गोरे,जिल्हा चिटणीस सदाशिव अंभोरे, जिल्हा उपाध्यक्ष भगवान राठोड, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गर्जे, भटके विमुक्त आघाडीचे चिटणीस देविदास गीते,ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर केंद्रे,माजी तालुकाध्यक्ष धोंडीबा भायगावे, माजी तालुकाध्यक्ष व्यंकटराव गव्हाणे, कंधार तालुकाअध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार, भाजपा शहराध्यक्ष निलेश गौर ,माझी पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण,माजी पंचायत समिती सदस्य अड सत्यनारायण मानसपुरे , ओबीसी आघाडीचे तालुका अध्यक्ष श्रीराम जाधव, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष डॉ जयमंगला औरादकर,तालुका उपाध्यक्ष शंकरराव जाधव, कृष्णा पापीनवार, संजय वारकड, नागनाथ चुडावकर, मारुती गवळे, माधव जाधव, शिवशंकर काळे सुमित लाटकर दत्ता वर्तळे, प्रविन पवार, विजय केंद्रे, आनंद गारोळे, विशंभर पवळे, माधव मुसळे, संभाजी घुगे, कमलाकर शिंदे, जगदीश राठोड, शरद मुंडे, प्रकाश दळवे, हनुमंत डुमणे, शोभाताई संगणवार, माजी नगरसेविका वंदना डूमने, स्मिताताई बडवणे सखुबाई ठाकूर, विजय चव्हाण, युवराज वाघमारे, केरबा केंद्रे, बजरंग यादव, सागर डोंगरजकर, राजीव मुकणर,प्रभाकर शिंदे, ज्ञानेश्वर श्रीमंगले, शिवसांभ देशमुख ,केशव तिडके, अशोक गीते, अमोल हाके,प्रवीण बनसोडे, सुमित लाटकर, गणेश ठाकूर, शुभम संगणवार शहाजी राठोड,डॉ विश्वनाथ राठोड यांची उपस्थिती होती वेळी या बैठकीचे सूत्रसंचालन शहर उपाध्यक्ष शंतनु कैलासे यांनी केले .

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *