अहमदपूर ; प्रतिनिधी
डॉ. उमाकांत शिवदास चलवदे यांना नुकतिच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ अंतर्गत शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी. प्राप्त झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संत महात्मा बसवेश्वर यांच्या साहित्यातून प्रतिबिंबित होणारे शिक्षण विषयक विचार : एक चिकित्सक अभ्यास या विषयावर या विषयावर मार्गदर्शक डॉ. व्ही.के.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य करुन प्रबंध स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे दाखल केल्यानंतर मुलाखतीअंती त्यांना पीएच.डी. ही उपाधि प्रदान करण्यात आली.
ङॉ उमाकांत चलवदे हे जगत जागृती विद्या मंदिर चाकूर येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव नरेश पाटील चाकूरकर, अध्यक्ष सर्वोत्तम काका कुलकर्णी व सर्व संचालक मंडळ, शिक्षण शास्त्र संकुल संचालक सिंकु सर, डॉ. सी. आर. बावीस्कर, बाह्यपरिक्षक डॉ. एस. टी. कोटवाने, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. विश्वंभर स्वामी, मुख्याध्यापक श्रीमती स्वामी एस.जी., पर्यवेक्षक उस्तुरगे पी.एल., नारागुडे एस.एम. चंद्रशेखर भालेराव, शेख ए.जी., राजु पाटील, कदम राजकुमार आदिंसह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य , मित्रमंडळी यांच्या वतिने सत्कार करुन अभिनंदन करण्यात आलेे.