मृग नक्षत्रात ज्वरी अन् कापसा सोबत तुरीची पेरणी होते.त्या तुर व्दिदल पिकांची वाढ होऊन डिसेंबर शेवटच्या आठवड्या पासून जानेवारी मध्या पर्यंत म्हणजे मकर संक्रांति सणा पर्यंत तुरीचे खळे-दळे जवळपास पूर्ण होतात.आमदाच्या वर्षाला तुरीचे पिक शेतकरी राजा बैलगाडीतून,ट्रॅक्टर वा गदर्भराजाच्या मदतीने ती तुरीची रास घरी आणतो.तंत्रज्ञान विज्ञान प्रगतीत मळणीयंत्राच्या युगातही आमचा शेतकरी राजा आपल्या शेतात तुर मोडून त्यास बडवून तुर अन् गुळी वेगळी करतांना “वावडीवर” उभे राहून तूर उधळून रास करतो आहे. त्यांची कषक भार्या परिवारातील सदस्य त्यांना त्या कामी मदत करत तुराटीच्या झाडूने अलगद तुर वेगळी करीत आहेत हे दृश्य दिसताच अस्सल ग्रामीण भागात क्षण टिपण्याचा मोह मला आवरता आला नाही.मळणीयंत्राच्या युगात ही कष्ट करणारी वृती खेडो-पाडी अन् वाडी-तांड्याच्या शिवारातील शेतात सध्या दिसून येते आहे.तुरीची अना तुरदाळीची आवक बाजारात वाढण्याचे संकेत आहेत.महाराष्ट्रात प्रत्येक स्वयंपाक घरात तुरदाळीचे वास्तव्य आढळते.त्या नगदी पिकांचे खळे-दळ्यांचे दर्शन सर्व शेतीमध्ये होते आहे.
कंधार- कुरुळा रोड वरील नेहरु नगर तांडा येथील कै.शिवरामजी तेजू पवार साहेब यांनी निर्माण केलेल्या दगड-गोटाळांच्या सानिध्यात निर्माण केलेल्या ज्ञानगंगेच्या कॅम्पसला लागुन असलेल्या शेतामध्ये शेतकरी राजा तुरीची रास करण्यात गुंतलेला शेतातील हा दुर्मिळ क्षण पाहण्याचा योग आला.तुरीचे खळे वाऱ्याचा झोत पाहून वावडीवर उभे राहून कृषिराज करतो.हल्लीचे राजकारण सत्तेचे रुक पाहून राजकीय स्वार्थ साधणे खरच एक फॅशन झाली आहे.
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार