कंधार:प्रतिनिधी
१२ जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन हा “जागतिक युवा दिन” म्हणून साजरा केला जातो, या दिनानिमित्त फुलवळ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन व या संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा “गौरव” करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य गोबिंदसिंग पाटनुरकर यांनी दिली आहे.
१२ जानेवारी या दिवशी “स्वामी विवेकानंद” यांची जयंती असून, हा दिवस “राष्ट्रीय युवा दिन” म्हणून भारतभर साजरा करण्यात येतो, या दिनाचे औचित्य साधत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील युवकांच्या विविध कलागुणांना तसेच कौशल्यांना वाव मिळावा, व प्रोत्साहन मिळावे, यासाठी पुढे दर्शविलेल्या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात वाद विवाद स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पारंपारिक क्रीडा, चित्रकला, त्याचबरोबर निबंध स्पर्धेसाठी ज्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला ज्यांचे नाव देण्यात आले आहे, त्यांचे जीवन कार्यावर निबंध स्पर्धा, व वकृत्व स्पर्धेसाठी आत्मनिर्भर भारत, स्वामी विवेकानंद यांचे उद्योजकता; कौशल्य याबद्दल विचार आणि देशाच्या विकासात कौशल्याचे महत्त्व हे विषय ठेवण्यात आले आहेत.
सदरच्या कार्यक्रमाचे उदघा- टक म्हणून आय.एम.सी. चे चेअरमन रमेश बाबू बुध्दे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या स्पर्धेत संस्थेतील जास्तीत जास्त आजी – माजीविद्यार्थ्यांस ह, पालक व ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी केशवराव धोंडगे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था फुलवळचे प्राचार्य गोबिंदसिंग पाटनुरकर यांनी केले आहे.