मुखेड:(दादाराव आगलावे)
ग्रामपंचायत अधिकारी नजीर सय्यद यांची मुखेड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी नुकतच निवड झाल्याबद्दल अ. भा. मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दि.१३ जानेवारी रोजी प. स. कार्यालय येथे भेट घेवुन त्यांचे अभिनंदन करुन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी मुखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सी. एल. रामोड, मार्केटी कमीटीचे संचालक तथा मुखेड विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व्यंकटराव लोहबंदे, अ. भा. मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेताब शेख, जिल्हा पत्रकार संघाचे सल्लागार अॅड. संदीप कामशेट्टे, अॅड आशिष कुलकर्णी, संजय कांबळे, कार्याध्यक्ष नामदेव श्रीमगंले, उपाध्यक्ष रामदास पाटील, विठ्ठल पाटीी येवतीकर, राजु रोडगे, प्रेस फोटोग्राफर गणेश अंबेकर यांच्यासह मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.