*कंधार प्रतिनीधी – संतोष कांबळे*
यंग इंडिया के बोल व आपकी आवाज आपका भविष्य या विषयावर लोहा कंधार विधानसभा युवक काँग्रेसची आढावा बैठक दि.११ वार शनिवारी पार पडली.
या बैठकीच्या सुरुवातीस माजी पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंगजी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर या बैठकीमध्ये महाराष्ट्र तसेच पूर्ण भारत देशामध्ये युवकांच्या समस्या याच्यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.लोहा कंधार युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश भाऊ भोसीकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सर्वांना मार्गदर्शन केले.
यावेळी लोहा कंधार विधानसभा मधील सर्व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव रवी पाटील कावलगावे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी कंधार युवक काँग्रेस शहराध्यक्ष अजय मोरे, कंधार युवक शहर कार्याध्यक्ष मोहम्मद नयुरुद्दीन, विधानसभा सचिव ओम पेठकर, शैलेश भोसीकर, शिवा बोरगावे, व्यंकटेश देवकते, अविनाश आंबटवाड, मोहम्मद शोएब, अक्षय संगणवार, शेख सुरज, नामदेव पेठकर, विजय सोळंके, तारकेश तपासे याचबरोबर इतर युवक काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.