मुखेड: (दादाराव आगलावे)
येथून जवळच असलेल्या वर्तळा येथील रहिवासी तथा लोहा येथील राजर्षी शाहू जि.प. शिक्षक सह. पतसंस्थेचे कर्मचारी श्री माधव सदाशिव अगलावे हे 30 वर्षाच्या दीर्घ सेवेनंतर 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त संस्थेने ११ जानेवारी २०२५ रोजी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी. ए. जोगदंड हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष गजानन ऊपरवाड यांनी केले. माधव सदाशिव आगलावे यांनी निष्ठेने, कर्तव्य भावनेने व सर्वांशी आदर युक्त भाव ठेवून सेवा बजावली. त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल जोड आहेर, शाल, श्रीफळ व पुष्पहारांनी त्यांचा यथोचित सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती संस्थेचे माजी अध्यक्ष बी.वाय. चव्हाण, राजीव पाटील,माजी सचिव ज्ञानोबा घोडके, एडवोकेट ऋषिकेश जोगदंड, डी. आर. शिंदे, पिराजी पोले, उपाध्यक्ष नामदेव गीते, सदस्य राठोड, बय्यास, सुरनर , राष्ट्रवादीचे राम पवार, नीलकंठ वडजे, वार्ताळा गावचे माजी सरपंच आनंद आगलावे सर, बालाजी डावकरे, नारायण आगलावे, सेवानिवृत्त माझा आगलावे यांचा मुलगा पोलिस कॉन्स्टेबल ईश्वर आगलावे, नातु महेश आगलावे सह संस्थेचे संचालक सभासद उपस्थित होते. सेवानिवृत्तीच्या सत्काराला उत्तर देताना माधवराव आगलावे म्हणाले की, माझ्या तीस वर्षाच्या कारकिर्दीत मी प्रामाणिकपणे माझी सेवा बजावलेली आहे सदरील पतसंस्थेच्या माध्यमातून माझा हजारो शिक्षक कर्मचाऱ्यांशी संबंध आला त्यांनी दिलेले प्रेम मी कदापीही विसरू शकणार नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव रावण वाघमारे यांनी केले. माधवराव आगलावे यांच्या सेवानिवृत्ती बद्दल शेषराव गुरुजी डावकरे, उत्तमराव आगलावे, मनोहर गुरुजी आगलावे, दादाराव आगलावे, किशन गुरुजी आगलावे, आनंद गुरुजी आगलावे, सरपंच प्रतिनिधी राजेंद्र गुरुजी केरुरे वर्ताळकर, यांच्यासह वर्ताळा येथील ग्रामस्थांनी तसेच लोह्यातील मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.