कॅलिफोर्निया घटनेतुन आपण काय शिकायचय ??

 

आपल्याकडे उभे रहात असलेले टॉवर आणि निसर्गाची होत असलेली हानी यामुळे पुढे जाऊन निसर्ग आपल्याला काय देउ शकतो याची झलक म्हणुन जरी याच्याकडे पाहिलं तरी बरच काही कळु शकेल पण कळलेलं जेव्हा वळेल तेव्हाच आपण सावध राहू..
आम्ही अमेरिकेत असताना कॅलिफोर्नियातील ते आलिशान बंगले पाहिले होते.. टेकडी तोडून त्यावर करोडो डॉलर चे बंगले उभारल्यानंतर माणसाला कदाचित गर्व येउ शकतो.. तसच काहीसं झालं असेल का ??निसर्गाच्या विरूध्द जाऊन आपल्याकडे असलेल्या पैशाच्या जोरावर आपण काहीतरी करतो तेव्हा निसर्ग ती व्यक्ती कोण आहे हे पहात नाही ..
मला एक गोष्ट किवा लिला म्हणुयात ती आठवली.. संपूर्ण वृंदावनमधे इंद्राची पुजा केली जायची त्यामुळे इंद्राला गर्व झाला.. अहंकार आला म्हणुन कृष्णाने संपूर्ण ब्रजवासीयाना सांगितले आजपासून इंद्राची पुजा बंद करुन गोवर्धन पर्वताची पुजा करा कारण कृष्णाला लोकांना निसर्गाचे महत्व सांगायचे होते.. इंद्राला श्रीकृष्ण म्हणजेच भगवंत हे माहित होतं. त्याची पुजा बंद केल्यामुळे इंद्राला राग आला म्हणुन त्याने प्रचंड पाऊस पाडला त्यामुळेच श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून त्याखाली लोकांना आसरा दिला.. एवढ्या मोठ्या पर्वताखाली सगळे उभे राहिले कारण श्रीकृष्णावर असलेला विश्वास आणि त्याचवेळी इंद्राला श्रीकृष्णाच्या ताकदीची कल्पना आली.. निसर्ग हाच मित्र हीच गोष्ट या लिलेतुन श्रीकृष्णाला सांगायची.. त्याची प्रत्येक लिला आपल्यासाठी होती.. पण आपण समजून घेतली नाही..
निसर्गाच्या पुढे आपलं काहीही चालत नाही.. पंचमहाभुताना चॅलेंज द्यायचा फक्त विचार जरी मनात आला तरी क्षणात सगळ्याची राख होवु शकते .. आपल्याकडे सुध्दा टेकड्या फोडून बांधकामं होत आहेत.. नाले अडवुन बिल्डींग बांधल्या जात आहेत.. २० वर्षे होत नाहीत तोपर्यंत लोकांना रीडेव्हलपमेंट करायची घाई आहे.. का आणि कशासाठी ??.. कोणी निसर्गाचा का विचार करत नाही ??.. कृष्णाला एकट्याला आपल्याला सगळ्याकडे लक्ष द्यायचे आहे त्यामुळे त्याची काळजी कोणाला का नाही ??
कॅलिफोर्नियासारख्या घटना ह्या आपल्याला पुढे येणाऱ्या वादळासाठीची तयारी तर नसेल ?? त्यांनी नक्कीच कष्टाने बंगले घेतले असतील पण टेकडी न तोडता बांधले असते तर ??.. तसच इथेही आपण चांगल्या मार्गाने आणि निसर्गाचा विचार करुन प्रॉपर्टी खरेदी करुच शकतो त्याला कोणीही अटकाव करणार नाही .. फक्त आपला हेतु शुध्द हवा.. आपल्याकडे असलेल्या गोष्टीबद्दल अहंकार नको कारण आज जे आहे ते कधीही जाऊ शकतं हे आपल्याला माहीत हवच..
हॉलीवूड सेलीब्रीटी रडताना व्हीडीओत पाहिले आणि वाईट वाटलं पण निसर्गाने त्याच्या जागेतून सगळ्याना बाहेर काढलं.. प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचला हाच तर यातुन मेसेज नसावा..
विचार करुन पहा
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *