कंधार ; प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष पांडागळे यांची निवड झाल्याबद्दल आज अभिनंदन केले .
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विद्यमान कार्याध्यक्ष, दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली .दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. गेल्या जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यकारिणीची मुदत संपल्यानंतर नूतन अध्यक्ष निवडीसाठी परिषदेचे निरिक्षक, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे यांनी वार्ताहर ते कार्यकारी संपादक असा पत्रकारितेतील प्रवास असलेल्या संतोष पांडागळे यांची निवड केली होती .माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष पांडागळे यांची निवड झाल्याबद्दल आज अभिनंदन केले .