मुलींची पलायनता चिंतनीय

 

 

सध्या अल्पवयीन मुली प्रेमासाठी कोणासोबत ही पळून जाण्याचे प्रमाण सर्वत्र खूप वाढले आहे. कारणाचा शोध घेतल्यानंतर हसावं की रडावं असं वाटत आहे. काही घरात मुला- मुलींमध्ये भेदभाव केला जातो. मुलांना जास्त लाडाने वागविले जाते. मुली घराबाहेर जाते वेळेस अनेक प्रश्न विचारले जातात.अविश्वास दाखवल्या मुळे मुली बाहेर निघून जातात. बऱ्याच मुलींना लैंगिक शिक्षणाची माहिती नसते. घरात कोणी त्यावर भाष्य करत नाही. त्यामुळे अर्धवट ज्ञान मिळते, यातून मुली पलायन करतात. वयात आलेल्या मुलींना आई- वडील धाकात न ठेवता समजून सांगून मन परिवर्तन करून त्यांच्यात लैंगिक शिक्षणाबद्दल असलेले गैरसमज दूर करावेत.
तेव्हाच हे प्रमाण कमी होईल. श्रीमती प्रियदर्शनी इंदिरा गांधीने प्रेम विवाह केला. तेव्हापासूनही अनेक तरुण-तरुणी त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे कटू सत्य आहे. महाभारतापासून आपण हे ऐकत आलो आहोत की,अर्जुनाने सुभद्रेचे अपहरण केले. तेव्हापासून अनेक लोकांच्या मनात अशा प्रकारच्या कल्पना येत आहेत. दोन जीवाचे मिलन होण्यासाठी ही कृती केली जाते. चांगल्या मार्गाने विवाह झाला तर तो टिकतो. समाजामध्ये चार चौघांमध्ये तो पावित्र्य टिकवून ठेवतो. एका जातीची दोन्ही व्यक्ती असल्या नंतर त्यांच्या अपत्यांना समाजात सन्मानाने वागता येते. नाहीतर एकाच घरात वेगवेगळ्या जाती धर्माचे माणसं वावरायला लागले. तर काही दिवसांसाठी या गोष्टी यशस्वी होतात. परंतु नंतर एकमेकाबद्दल घृणा मनात निर्माण होते. आणि 80 टक्के पलायनता विवाह अयशस्वी होतात. याचे परिणाम समाजात आई-वडिलांना भोगावे लागतात. आई-वडील मुलीच्या जन्मापासून ते तिला समज येईपर्यंत अहोरात्र तिच्या शिक्षणाची सोय करतात.इतर ठिकाणी ठेवून तिचे लाड पुरवतात.मुलगी ही आपली पणती आहे. मुलगा हा आपल्या वंशाचा दिवा आहे, म्हणून तळ हातावरल्या फोडाप्रमाणे आपल्या अपत्यांना जीव लावतात ही अपत्य पुढील काळामध्ये आई-वडिलांना धोका देत असतील तर ही चिंतनीय बाब आहे.शेतात राबणारा कष्टकरी, कामकरी, शेतमजूर बाप मुलीच्या शिक्षणासाठी लोकांच्या घरी नोकर राहून आपल्या मुलीचे लाड पुरवतो. स्वतःच्या पायाला चपला नाहीत,अंगात चांगला सदरा नाही, कोणतीच हौस-मौज नाही. एखाद्या वर्षभरात एखादी देवाची वारी करून तेवढ्यावर समाधान मानून लेकरांसाठी जीव की प्राण करतो. घार हिंडते आकाशी। चित्त तिचे पिल्लापासी।। तसे आज बाप मुलींना संपूर्ण शक्ती एकवटून खर्च करताना दिसत आहेत. महत्त्वाचा मुद्दा सांगायचा असेल तर आज मुली घरातून, कॉलेजमधून यात्रेतून, जत्रेतून का पळून जात आहेत?त्याची मूळ कारण काय आहेत? आपल्या घरात झालेला त्रास मुलींना सहन होत नाही, त्यांच्या दृष्टीने तो त्रास असतो. परंतु आई-वडिलांच्या दृष्टीने ते केलेले संस्कार असतात.मुलांना लहानपणी राग राग करावं लागतं,आंघोळी घालाव्या लागतात, त्यांचे नाक पुसावे लागते. त्यांना घरातली छोटी मोठी काम सांगावे लागतात. हे आपल्या रोजच्या जीवनातील कामाचा भाग आहे. परंतु मुलांना वाईट वाटते. की ही कामे आपल्याला का सांगतात. असे त्यांना वाटून ते रुसतात. एखाद्या वर्षी नापास झाल्यास आई-वडील रागावतात म्हणून ते घरात येत नाहीत. जीवन हे फार सुंदर आहे ते जगता आलं पाहिजे. आपल्या बरोबरचा मुलगा सुध्दा पाहत नाहीत. ज्या मुलाकडे स्वतःच्या अंगावरले कपडेच आहेत. यांचाही विचार ह्या मुली करत नाहीत. ही गोष्ट अतिशय वाईट आहे. एक-दोन वर्ष त्या मुलासोबत राहून परत घराकडे येण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस त्या सर्वस्व गमावलेल्या असतात. आई-वडील, नातेवाईक ,मित्र मंडळ या सर्वांमध्ये आई-वडिलांची निंदा नालस्ती झालेली असते. हे दुःख अनेक आई-वडिलांच्या जिव्हारी लागते. व ते या जीवनातून जीवन संपवून टाकतात.असे अनेक गोष्टी या आपल्या राज्यात घडत आहेत. दररोज कुठं ना कुठं मुली पळून जाण्याचा प्रमाण वाढतच आहे.
ही गंभीर बाब होऊन बसले आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून जाणीव जागृती समाजात केली पाहिजे.
नसता चारित्र्यहीन जीवन जगण्याची आता सवयच लागली काय? असं आपल्याला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कसल्याही पद्धतीचा मानवाला जीवनात कलंक नको. शुभविवाह का म्हटले जाते. सर्व गोष्टी चांगल्या सदाचारी घडलेल्या असतात. आई-वडील वर पक्षाला मुलींना सांभाळण्यासाठी विनंती करतात. भोजन देतात वाजंत्री वाजवून मिरवणूक काढून सन्मान करून सासरी पाठवितात.परंतु मोबाईलच्या व्यसनामुळे अनेक तरुणी चुकीच्या पद्धतीने पाऊल टाकत आहेत. सर्व दोष मोबाईलला देऊन चालणार नाही? मोबाईल चांगलाही आहे.
परंतु सर्व वाईट पाहुन मुली मुलांच्या संपर्कात राहून शारीरिक सुखासाठी आपलं संपूर्ण चारित्र्य धुळीला मिळवत आहेत. म्हणून पलायन करून काय साध्य होणार आहे? हा एक चर्चेचा विषय झाला आहे. ज्यावेळेस मुलं मुली शिकलेल्या नव्हत्या, तेव्हा ही परिस्थिती जाणवत नव्हती. परंतु आता मुलगी शिकली प्रगती झाली. आणि कोणालातरी घेऊन पळून गेली. असे म्हणण्याची अपमानास्पद वेळ पालकावर आलेली आहे. आज खरोखर आपण स्वतंत्र भारतात आहोत याची जाणीव मुलींना राहिली नाही. मुला-मुलींनी ब्रह्मचर्य सांभाळावे, गृहस्थाश्रमा मध्ये सर्व काही करता येते. त्यासाठीच तो पूर्वजांनी सांगून ठेवला आहे.
परंतु आता संयम राहिलेला नाही.15 ते 45 वर्षे वयापर्यंत मुली, विवाहित महिला घर सोडून अक्षरश:पळून जात आहेत हे कशाचं लक्षण आहे. आज आपण महाराष्ट्रात एवढी प्रगती करत आहोत. सर्वत्र शाळा महाविद्यालये प्रगती पथावर आहेत. विज्ञान तंत्रज्ञानामध्ये झालेल्या सुधारणा, रस्ते, वीज ,वाहतूक, पाणीपुरवठा,ग्राम सुधारणा सर्व काही करून यशाच्या शिखरावर आपण पोहोचत आहोत. परंतु इकडे मुलींनी पळून जाण्याची स्पर्धा लावली आहे काय ?अशी बिकट अवस्था समाजात निर्माण झाली आहे. समाजाचं स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी समाज एक संघ असावा. परंतु वाईट गोष्टीमुळे समाजातील पती-पत्नीला जीवन जगणं नकोस होऊन जाते. मोठमोठे व्यक्ती आंतरजातीय विवाह करून सुखी आहेत. असे या मुलींना वाटते? त्यांचा कित्ता तो गिरविण्याचा प्रयत्न करतात. मोठ्यांचं काहीही चालते. त्यांना कोणीही बोलण्याची हिंमत करत नाही. सापाच्या तोंडात कोणी बोट घालत नाही. परंतु शेळीचे कान धरून सगळेजण तिला बदडतात ही समाजाची रीत आहे. म्हणून दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मोबाईल हातात घेऊन अक्षरशः रात्रभर काहीजण जागत आहेत. यामधून अनेक कल्पना डोक्यात येत आहेत.त्यानुसार क्रूरकर्म करणं, नात्यातील व्यक्तींना त्रास देणं, खंडणी मागणं, किंवा पळून जाणं या सगळ्या गोष्टी आता उघड उघड घडत आहेत. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली तरीही ग्रामीण भागातील अंधश्रद्धा, वेडगळ समजुती, भानामती ,काळीबाहुली, सातआसरा, शकून,अपशकून,भूत पिशाच्च यांच्या कथा सांगितल्या जातात.पुरोगामी महाराष्ट्रात या गोष्टी होणं चांगलं नाही. एका बाजूला समाज सुधारक महिलांनी समाजासाठी अहोरात्र कष्ट केले. संपूर्ण आयुष्यभर समाजसेवा केली. विद्येची महती दाखवून दिली. तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये अनेक महिलांनी शौर्य गाजवून मराठवाडा मुक्त केला.
अनेक महिला आज स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते राष्ट्रपती पदापर्यंत विराजमान झालेल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला सुशिक्षित महिला सुद्धा वेगवेगळ्या मार्गाने पलायन करत आहेत. ब्युटी पार्लर ,मसाजच्या नावाखाली मोठमोठ्या शहरांमध्ये कुंटणखाने चालू आहेत.अनेक शहरांमध्ये दिवसाढवळ्या वेश्याव्यवसाय चालू आहे.त्यामुळे अनेक उच्चभ्रू वस्तीतील महिलाही यामध्ये मागे नाहीत हे सांगणं सुद्धा आता संस्कृतीला शोभत नाही.
आपला प्रियकर आपला करण्यासाठी या आधुनिक मुली कोणत्याही थराला पोहोचत आहेत. ही बाब आपल्या संस्कृतीला चांगली वाटत नाही. आपण इतर देशाचे अनुकरण करत आहोत.आपल्या संस्कृतीनुसार डोक्यावर पदर घेऊन महिला वागत होत्या परंतु आज फॅशनच्या नावा खाली अंगवस्त्र कमी होण्याची वेळ आली आहे. सध्याला लुगडे जाऊन साडी आली.साडी आल्यानंतर त्यातूनही आता पंजाबी ड्रेस आले. पुढे जाऊन त्यामध्ये स्कर्ट निर्माण झाले .आणि आता बिकनी पर्यंत काही सुशिक्षित मुलींची महिलांची मजल गेली. यामुळे अनेक पुरुष कामुक नजरेने मुलींकडे पाहून अनर्थ घडत आहेत. या गोष्टीला दोन्ही जबाबदार आहेत. मानवी वृत्तीला वेगळे काही दिसेल की ती पाहण्याची हौस असते. म्हणून महिलांनी अंगभर वस्त्र वापरावेत. आपली वेशभूषा, केसभूषा,बोली भाषा चांगली ठेवावी. पुष्पा दोन चित्रपटामध्ये किस कलर की चड्डी पहनी हो? हा डायलॉग सुसंस्कृत समाजाला शोभत नाही. तेव्हा आपण संस्कृतीचे जतन करू. आज मुली पळून जात असल्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत ते होऊ नयेत म्हणून समाजात एकोपा निर्माण व्हावा व चांगले संस्कार करून समाज हित साधावे ही अपेक्षा…

*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष :विठू माऊली प्रतिष्ठान
खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *