*कंधार प्रतिनिधी- संतोष कांबळे*
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची ४२७ वी जयंती गंगनबीड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी लहानपणापासूनच शिवरायांच्या मनात स्वराज्याची संकल्पना रुजवली शिवाजी महाराजांना शस्त्र आणि शास्त्र असे दोन्हीचेही शिक्षण त्यांनी त्यांच्या मनात उतरविले. राजे असल्याची भावना रुजवली आणि रयतेचे आदर्श राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली अशा राजमाता जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गंगनबीड येथील जिजाऊ भक्त १२ जानेवारी रोजी सकाळी अभिवादनासाठी उपस्थित होते. प्रथम माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर जय जिजाऊ जय शिवराय अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष संदीप पाटील तोंडचिरे. तालुका संपर्क प्रमुख संभाजी राहेरकर, सरपंच व्यंकटराव राहेरकर, आप्पाराव पा. तोंडचिरे, माजी सरपंच धोंडीबा पा. राहेरकर, शिवा पाटील तोंडचिरे, माजी सरपंच दत्ता फैलवाड,राज पा. डांगे, विजय पा. राहेरकर, विश्वनाथ पा. तोंडचिरे ,एकनाथ भंगारे, मारोती फैलवाड, रमेश पा. राहेरकर ,चंद्रकांत पा. राहेरकर, मारोती पानपट्टे, संतोष पा. तोंडचिरे ,बालाजी तोंडचिरे ,वेदांत राहेरकर ,रामराव मध्यबैनवाड, दत्ता पा. राहेरकर ,सोपान किनेवाड यांसह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.