प्राचीन भारताची महानता वाखाण्याजोगी..!

 

 

प्राचीन भारताची महानता अलौकिक होती.तसेच पूर्वी भारताला सोने की चिडिया असे म्हटले जात होते.
कारण ही तसेच होते.जगातील पहिल्या तक्षशिला शैक्षणिक विद्यापीठाची स्थापना भारतातच झाली. त्यावेळी तेथे 62 पेक्षा जास्त विषयाचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिल्या जात होते. तेथे 11000 विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जगभरातून येत होते.अशी महानता पूर्वी प्राचीन भारताची होती.

आर्यभट्टानी शून्य (0) या संख्येचा शोध सर्वप्रथम भारतात लावला. त्यामुळे भारताची मान सर्वत्र उंचावली. सर्व भाषांची जननी संस्कृत भाषेचा जन्म भारतात झाला म्हणून भाषा हे देवाण -घेवाणीचे
साधन ठरले.

अडीच हजार वर्षांपूर्वी वनोऔषधीचे पिता चरक यांनी अनेक आयुर्वेदिक औषधीचे शोध लावले. त्यामुळे जगात भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. सन 700 वर्षांपूर्वी सिंधू नदीमध्ये नौका पर्यटनाचा शोध लागला. त्यामुळे आज नौकानयनास चांगले दिवस आले आहेत. भास्कराचार्यांनी पृथ्वीला सूर्याभोवती भ्रमण करण्यासाठी लागणाऱ्या अचूक वेळेची आकडेमोड करून ठेवली होती. बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती यांचा उगम भारताचा झालेला आहे.जगातील हिऱ्याची निर्मिती करणारा एकमेव देश म्हणजे भारत होय.1896 पर्यंत कोहिनूर हिऱ्याला कसलाही धोका झाला नव्हता. भारतातील अनेक राजे महाराजांनी त्यांना सांभाळून ठेवले होते.परंतु शेवटी महाराजा रणजीत सिंग यांच्याकडे तो कोहिनूर हिरा आला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा दलीपसिंग यांच्याकडून इंग्रजांनी बळजबरीने तो हिसकावून घेऊन गेला.आज तो लंडनमध्ये आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात सुदर्शन नावाच्या तलावाची निर्मिती त्यांनी केली.त्यानंतर इतर ठिकाणी ही तलाव तयार करण्यात आले .शतरंज या खेळाचे जन्मही भारतात झाला आहे. म्हणून प्राचीन भारत अतिशय सुधारलेल्या अनेक देशांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसणारा होता.भारतात संयुक्त कुटुंब पद्धती होती.ज्येष्ठांचा आदर कुटुंबातील सर्व व्यक्ती करत होते.गुरुजनांचा आधार विद्यार्थी करत. शेतीतील पिके, फळे सेंद्रिय खताचे होती. त्यामुळे लोक धष्टपुष्ट दिसत होते. कोणत्याही प्रकारचा रासायनिक खताचा परिणाम नसल्यामुळे शेणखतावरील पीक जोमाने येऊन आरोग्य चांगले राहत असे. लोकांना एकमेकाबद्दल दया माया होती. विवाह लहानपणीच होत असल्यामुळे पळून जाण्याची कोणतीही तक्रार नव्हती ,नात्यातले नात्यात विवाह होत होते. त्यामुळे नात्यात आजीवन गोडवा होता. मोबाईल टीव्ही संगणक इतर तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. एकमेकांच्या घरी उसने देणे घेणे चालू होते. एकमेकाबद्दल सहिष्णुता वाटत असे. साधू संतांनी सांगितलेले गोष्टी लोकं ऐकत होते. कोणताही कार्यक्रम सभा, धार्मिक
विधी, जागरण ,गोंधळ बराच समाज अशिक्षित असल्यामुळे गुपचूप भारतीय बैठक घालून ऐकत असे. तुमचे दुःख ते आमचे दुःख म्हणून समाज एकमेकांच्या सुखदुःखात सामील होत असे. कोणत्याही जातीचा माणूस आला तरी मानवतावादी दृष्टिकोन बघून त्यांना मीठ भाकर दिली जात असे.कबड्डी, लगोरी, विटीदांडू, लपंडाव, सूरपारंब्या असे खेळ सर्व जाती-धर्माची मुलं एकत्रित खेळत होती. थोर महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी एकत्रित साज-या केल्या जात होत्या.
गावात आलुतेदार आणि बलुतेदार पध्दती असल्यामुळे गावकीचा गाडा ओढला जात असे. कोणताही समारंभ साध्या पद्धतीने होत असे.शासकीय अधिकाऱ्याचा सन्मान ठेवला जात असे.
त्यामुळे प्राचीन भारताची महानता
वाखाण्याजोगी होती असे मला या ठिकाणी सांगावे वाटते. उद्याच्या अंकात आधुनिक भारताची वाटचाल अधोगतीच्या दिशेने….

*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत* अध्यक्ष: विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड जि.नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *