कंधार : प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळ कंधार आगारात भारतीय जनता पार्टी प्रणित व आ. गोपिचंद पडळकर व आ. सदाभाऊ खोत प्रणित सेवा शक्ती संघर्ष संघाची दि. १६ जानेवारी रोजी शासकिय विश्राम गृह कंधार येथे पार पडलेल्या बैठकीत′ गंगाप्रसाद यन्नावार तालुका अध्यक्ष भाजपा, गोविंद फुले विभागिय सचिव यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत कंधार आगार अध्यक्ष पदी संभाजी घुगे तर सचिव पदी शंकर दुल्हेवाड तर महिला कार्यकारणी अध्यक्षा जयश्री मुंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सेवाशक्ती संघर्ष कर्मचारी संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड दि १६ रोजी करण्यात आली यावेळी झालेल्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव गोविंद फुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीत नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली यावेळी उपाध्यक्ष निवृती पोले, कार्याध्यक्ष शिवराज बोधगीरे, सह सचिव मधुकर मुंडे, बाळु केंद्रे, प्रसिध्दी सचिव कपिल लासे, आर. एम. जंगले, व्ही.बि. अभंगे, कोषाध्यक्ष नामदेव धोंडगे, एम यु रेणकुंटवार, गजानन कानडे, सदस्या एस.डी मारवाडे, आर. व्ही. शेंडगे, डी.एस.केंद्रे, व्ही.एल.किरतवाड, एस. बी. एंगलवार यांची निवड करण्यात आली.या प्रसंगी आर.एम. केंद्रे, आर.जे.पाटील, डि.एम. कंधारे, संभाजी धाबेवार, आर.एम. आडकुटे, एस.एस. शेळके, एस. एस. केंद्रे, दि पक कोंम्पलवार, मोहन शेकापुरे, पि.आर. गित्ते, जे.पी. मुंडे, व्ही.डी.मुंडे, विक्की मंगनाळे यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थीत होते.