कंधार ; प्रतिनिधी
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्र महाराज यांच्या प्रेरणेने स्व स्वरूप संप्रदाय कंधार च्या वतीने १९ जानेवारी रोजी कंधार येथे रक्तादान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या स्व स्वरूप संप्रदाय च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबवले जातात गरजू महिलांना शिलाई मशीन, शेतकऱ्यांना शेतीची अवजारे ,अपंगांना कृत्रिम अवयव, व रुग्णसेवेसाठी ॲम्बुलन्स इत्यादी सामाजिक उपक्रमाद्वारे गरजूंना मदत केली जाते त्याचप्रमाणे नरेंद्र महाराज संप्रदायाच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते यावर्षी १९ जानेवारी रोजी श्री बालाजी मंदिर भवानी नगर कंधार येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या रक्तदान शिबिरात सर्व रक्तदात्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान स्व-स्वरूप संप्रदायाचे कैलास जाधव, शरद बामणे, साईनाथ व्यास, व राजेंद्र वाघमारे यांनी केले आहे