किनवट : तालुक्यातील जि. प. प्राथमीक शाळा नंदगाव तांडा येथे दि. 21 व 22 जानेवारी 2025 रोजी जलधारा केंद्रस्तरीय खेळ ,क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन केलेले आहे. सदर बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस (टी-शर्ट व ट्रॅक पॅन्ट) चे वाटप करण्याचे ठरवले होते. आज प्रत्यक्षात त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना लोकवर्गणीतून स्पोर्ट ड्रेसचे वाटप करून परिसरात एक आदर्श निर्माण केला. ॲड. दिलीप रामसिंग राठोड, अमोल विजय राठोड (शा.पो.आ. किनवट), आनंद बळीराम जाधव (माजी सैनिक), लखन रामराव आडे ,पी. एम. आडे (ग्रामपंचायत अधिकारी), संजय बापूराव जाधव (हैदराबाद), संदीप गुलाब जाधव (पोस्ट ऑफिस किनवट), बालाजी रामा राठोड, लखन भगवान आडे,
ॲड.निलेश शंकर राठोड, अंकुश विश्वनाथ आडे, डॉ. सुनील दत्ता राठोड, कैलास व्यंकटराव आडे, राजेश दिलीप आडे, बालाजी जनार्दन चव्हाण, ज्ञानेश्वर जनार्दन चव्हाण, ज्ञानेश्वर दत्ता पवार, के.डी.जाधव (ग्रामपंचायत अधिकारी) आजेश भोजू जाधव व बजरंग मोहन राठोड इत्यादी दानशूर व्यक्तिमत्त्वांनी यात हातभार लावला. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी सर्वांचे आभार मानले.