जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा संपन्न … 1 हजार 382 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

 

मुखेड: (दादाराव आगलावे)

जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता सहावी प्रवेशासाठी मुखेड तालुक्यातील सहा केंद्रावर परीक्षा संपन्न झाली.
जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड 283,
गुरुदेव प्राथमिक विद्यामंदिर 221, शाहीर अण्णाभाऊ साठे विद्यालय मुखेड 205, नृसिंह विद्यामंदिर उमरदरी 260, माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडी 214, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय 199 असे सहा परीक्षा केंद्रावर एकूण 1382 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून कंधार तालुक्यातील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक केंद्रावर केंद्र संचालक, केंद्रस्तरीय निरीक्षक यांच्यासह , बैठेपथक तैनात करण्यात आले होते. परीक्षेदरम्यान सर्व परीक्षा केंद्रांना कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे, प्रशिक्षणार्थी उपशिक्षणाधिकारी प्रिया डहाळे, अराजपत्रित मुख्याध्यापक गोविंद चव्हाण तालुका परीक्षा प्रमुख सायलू करेवाड यांनी आकस्मिक भेटी देऊन निरीक्षण केले.

परीक्षेच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब कदम ,शिवाजी येवतीकर, डॉ शिवाजी कराळे, नागनाथ द्याडे, केंंद्रप्रमुख उत्तम चव्हाण, मुख्याध्यापक दिलीप कांबळे, गोविंद गिरी, गजानन पवितवार, श्रीपत वाडीकर, मुख्याध्यापक संदीप गेटकेवार, संदीप पेंडलवार, मधुकर गायकवाड यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *