भरधाव वेगाने जाणारा टिप्पर व दूचाकी चा भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार!.* *फुलवळ दत्तगड शेजारील मुख्य रस्त्यावरील घटना..*

 

(*कंधार प्रतिनीधी – संतोष कांबळे )

कंधार तालुक्यात अवैद्यरित्या रेती भरून भरधाव वेगात जाणाऱ्या विना नंबरच्या टिप्परने दुचाकी चालकास समोरा समोर धडक दिल्यामुळे दुचाकी चालक हा जागीच ठार झाल्याची घटना दि.२० जानेवारी रोज सोमवारी सायंकाळी ४:३० च्या सुमारास बहादरपुरा – फुलवळ दरम्यान (दत्तगड बिजेवाडी फाटा ) असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर दत्तगड शेजारी ही घडली असून, रेती घेऊन जाणारा टिप्परने या ठिकाणाडून पलायन केल्याचे प्रत्यक्ष दर्शनीनी सांगितले आहे.

शिवा रामराव कावलगावे रा. बोरी (बु.) तालुका कंधार येथील रहिवासी असून, ते दि. २० जानेवारी रोज सोमवारी सायंकाळी ४:३० च्या सुमारास दुचाकी क्रमांक एमएच २६ बीएफ ६२०३ वर बसून आपल्या पत्नीसोबत फुलवळ मार्गे कंधारकडे जात असताना बहादरपुरा – फुलवळ रोडवरील दत्तगड बिजेवाडी फाट्यावर अवैध्यरित्या रेती भरून भरधाव जाणाऱ्या विना नंबरच्या टिप्परने दुचाकीस जोराची धडक दिल्यामुळे शिवा रामराव कावलगावे हा जागीच ठार झाला तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे, सदरच्या महिलेस कंधार येथील ग्रामिण रुग्णालय कंधार येथील रुग्णवाहिका व पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर खजे, कोकाटे, पोलीस जमादार बापूराव व्यवहारे, संतोष काळे यांच्यासह पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन त्या महिलेस उपचारासाठी कंधार ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले.

तरूण मयत शिवा कावलगावे यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई – वडील, बहिण – भाऊ असा मोठा परिवार आहे. कावलगावे यांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच बोरी गावावर शोककळा पसरली आहे.
अवैध व विना नंबर प्लेटच्या या मार्गावर धावणाऱ्या टिप्परचा बंदोबस्त करण्यात यावेत अशी मागणी या परिसरातील नागरिक करत आहे .
वृत्त लिहेपर्यंत सदरच्या अपघात प्रकरणातील पलायन केलेल्या टिप्परची चौकशी करून गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती कंधार पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *