*कंधार (प्रतिनिधी)*
कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी संजय भोसीकर यांची निवड करण्यात आली असून खासदार प्रा.रविंद्र पाटील चव्हाण,नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते नायगाव येथील कॉग्रेस पक्षाच्या कार्यक्रमामध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर,माजी जि.प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर,प्रदेश काँग्रेस सरचिटणीस शाम दरक,डॉ.श्रावण रॉपनवाड,केदार पाटील साळुंके,सुरेंद्र घोडजकर,प्रदेश प्रतिनिधी एकनाथ मोरे,माजी सभापती संजय बेळगे,राहुल हंबर्डे,जिल्हा कार्याध्यक्ष शमीम अब्दुल्ला,माजी नगरसेवक शहाजी नळगे,डॉ.राजेश गुट्टे माजी नगरसेवक राजेंद्र कांबळे सतिश देवकत्ते,सुरेश कल्लाळीकर,ॲड कुट्टे,वैजनाथ जक्कलवाड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना संजय भोसीकर म्हणाले की काँग्रेस पक्षातील सर्वांना विश्वासात घेऊन कंधार तालुक्यात काँग्रेस पक्ष बळकट करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वांना सोबत घेऊन जिंकण्याचा माझा प्रयत्न राहील,याप्रसंगी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी,काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले,आ.अमित भैया देशमुख, खा.प्रा.रवींद्र पाटील चव्हाण,खा.डॉ.शिवाजीराव काळगे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर,माजी आमदार ईश्वरराव भोसीकर,माजी नगराध्यक्ष अरविंदराव नळगे, प्रदेश सरचिटणीस केदार पाटील सोळुंके,जिल्हा कार्याध्यक्ष शमीम अब्दुल्ला,प्रदेश प्रतिनिधी एकनाथराव मोरे सर्वांचे निवडीबद्दल आभार मानले .