(कंधार ; महेंद्र बोराळे.)
प्रजासत्ताक दिनानिमित्त आज दि २० जानेवारी २०२५ रोजी कंधार येथिल महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आनंदनगरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या आनंदनगरी कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव पाटील केंद्रे साहेब आणि पर्यवेक्षक व्यंकटराव पुरमवार सर यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने पर्यवेक्षक व्यंकटराव पुरमवार सर
यांच्या हस्ते मा.जिल्ह परीषद सदस्य संभाजीराव पाटील केंद्रे साहेब यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना संभाजीराव पाटील केंद्रे यांनी मार्गदर्शन करताना म्हणले की आनंदनगरी खरी कमाई उपक्रमातून बालकांना आर्थिक व्यवहार चिकाटीने कसा करावा यासह गणिती व्यवहार समजण्यासाठी उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले .
त्यांना सहकार्य चंद्रकांत पडलवाड सर,प्रा.अरूण केदार, अमित लोंड सर, प्रा.सौ.स्वाती रत्नगोले मॅडम,प्रा.अमित केंद्रे,प्रा.राहुल गित्ते ,प्रा.विजय राठोड,प्रा.पंकज पाटील, शिवाजी मेंडके सर, महेंद्र बोराळे सर, पवन लाडेकर सर,अनिल बोईवार सर,किशन ठोंबरे सर , सुर्यकांत श्रीमंगले सर, पत्रकार एस.पी.केंद्रे , सर ,प्रा.गिरीश नागरगोजे,प्रा.देविदास जायभाये,प्रा.हाणमंत भालेराव ,प्रा. गोविंदराव आडे अदिनी सहकार्य केले.आणि पालकांची विद्यार्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.