(कंधार ; दिगांबर वाघमारे )
खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांचे अर्जित रजा अनुज्ञेय असताना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय नाही असे शिक्षण संचालक (प्रा.) पुणे यांने आदेशित केले .पुर्वी लक्ष प्रभावाणे देयक अर्जित रजा रोखीकरण देण्यात यावे यासाठी निवेदन दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी कुंडलवाडी येथे शिक्षक आमदार माननीय श्री विक्रम काळे व पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांची भेट शिष्टमंडळाने घेऊन निवेदन दिले .
दि. 23 जानेवारी 2013 अप्पर सचिव महाराष्ट्र शासन श्री प्र.सु.प्रधान यांचे पत्र क्र. 2012/स.क्रं. 328/12/माशि-2 शाले शिक्षण क्रिडा मंत्रालय, मुंबई व दि. 15.02.2013 शिक्षक संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे-1 यांचे पत्रान्वये दि. 09.04.2001 अन्वये रजा रोखीकरणा संदर्भातील आदेश खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांनाही लागू असल्याने दि. 01. मे 2024 पर्यंत खाजगी प्राथमीक शाळेतील मुख्याध्यापकांचे अर्जि रजा अनुज्ञेय माणून रजा रोखीकरण करण्यात आले पंरतु दि. 30 मे 2024 च्या मा. शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे श्री शरद गोसावी यांनी खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुदेय नाही.
असे लेखी पत्र दिल्यामुळे रोखीकरणाचे बिले स्वीकाले जात नाहीत. ज्याचे स्वीकारले आहेत. त्यांना शिक्षणाधिकारी प्रा.जि.प. नांदेड यांचे दि. 24 जानेवारी 2025 जा.क्रं. 583 पत्रान्वये अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय नाही.करीता आपला प्रस्ताव अमान्य करण्यात येत आहे. असे कळविले असून विनंती की. खाजगी प्राथमिक मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावे अशी विनंती मागणी द्वारे करण्यात आली .
कुंडलवाडी येथे गंगाबाई सबन्नवार उच्च मा .विद्यालयातील प्रा.शंकरराव पवार यांच्या सेवानिवृती कार्यक्रमास शिक्षक आमदार माननीय श्री विक्रम काळे व पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती .यावेळी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी शिक्षक महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.महासंघ प्रांत उपाध्यक्ष हरीहर चिवडे ,नांदेड जिल्हा सचिव ,श्री हनमंतराव डाकोरे,महासंघ कंधार तालुकाध्यक्ष भास्कर पाटील कळकेकर , शिक्षक नेते राजहंस शहापुरे , महासंघ जिल्हा संघटनमंत्री दिगांबर वाघमारे , सुभाष मुंडे सर , पत्रकार तथा महासंघ जिल्हा उपाध्यक्ष अशोक दगडे ,पाटील सर, देशमुख सर ,देगावकर सर, टिपराळे सर ,शरीफ सर , काळेकर सर, सूर्यवंशी सर ,कापसे सर, या सर्व उपस्थित मंडळींनी दोन्ही आमदारांना भेट देऊन मुख्याध्यापकांना रजा रोखीकरणाचे देयक नाकारल्यामुळे यांना निवेदन देण्यात आले.