कंधार शहर व तालुक्यात शिवसेनेचे ( उबाठा ) ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात.!

 

(कंधार  ; प्रतिनिधी संतोष कांबळे )

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पक्षबांधणीसाठी आणि नव्या युवकांना संधी देण्यासाठी शिवसेना सदस्य नोंदणी अभियान दि 23 जानेवारीपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कंधारच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत आलेले अपयश आणि पक्षांतर याच्या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाने कंबर कसली असून त्यासाठी ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्हा प्रमुख भुजंग पाटील, बबन बारसे यांनी लोहा- कंधार विधानसभा निवडणुकीत मिळालेले मताधिक्य टिकून राहील याची काळजी घेण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद गट, पंचायत समिती, गाव निहाय नोंदणी अभियान राबविण्यात येते आहे. जिल्हा परिषद गटसाठी किमान १००० सदस्य, पंचायत समिती गणासाठी ५०० तर प्रत्येक गाव निहाय १०० सदस्य नोंदणी यासाठी जवाबदारी निश्चित केली असून उपजिल्हा प्रमुख भालचंद्र नाईक, कंधार तालुका प्रमुख परमेश्वर जाधव, शेतकरी आघाडीचे प्रमुख शिवाजी कदम, तालुका संघटक पंडित देवकांबळे, उप तालुका प्रमुख दादाराव पा शिंदे,
उप तालुका प्रमुख संदीप पाटील काळम, उपतालुका प्रमुख सय्यद अबरार, उस्मान नगरचे माजी सरपंच अमीन भाई आदमनकर माजी सरपंच अमीनशहा फकीर माजी उपसरपंच राहुल सोनसळे गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील काळम युवासेना सर्कल प्रमुख संतोष पाटील घोरबांड आनंद पाटील घोरबांड, उद्धव पाटील घोरबांड, रोहिदास शिरढोणकर, नामदेव गंगातिरे, हनुमंत घोरपडे, सर्व शिवदूत, शाखाप्रमुख, शिवसैनिक याच्यावर जवाबदारी दिली असून कंधार शहरात प्रत्येक वार्ड निहाय १०० तर प्रभाग निहाय ३०० सदस्य नोंदणी यावर भर देण्यात येणार आहे. कंधार शहरात ज्येष्ठ शिवसैनिक माजी नगरसेवक श्री गणेश कुंटेवार, शहर अध्यक्ष अतुल पापिनवार, उपाध्यक्ष कपिल जोंधळे, रमेश लुंगारे, रविराज जाधव,आशिष जोगे, व्यंकटेश फुले, रहीम शेख, यांच्याकडे जवाबदारी दिली आहे. लवकरच पक्ष संघटना मजबूत व बळकट करण्यासाठी आढावा बैठक, तालुका पदाधिकारी मेळावा घेण्यात येणार असून त्यासाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जुने-नवे शिवसैनिक कामाला लागले असून शिवसेना पक्ष नव्याने उभारी घेईल हीच अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *