उन्हाशी नातं जोपासणारा मुख्याध्यापक गोविंद चव्हाण

 

(जि. प. हायस्कूल सावरगाव (पीर) ता. मुखेड येथील मुख्याध्यापक गोविंद चंदर चव्हाण हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत, त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा लेख देत आहोत- संपादक)
आज पासून माझे ऊन्हाशीच नाते आहे मागच्याच वळणावरती मी सावलीला सोडलेले आहे या वक्तीप्रमाणे सतत धडपडत राहणारे व्यक्तिमत्व म्हणून तालुकाभर नव्हे तर जिल्हाभर आदर्श मुख्याध्यापक जी सी चव्हाण यांचा नावलौकिक आहे. जेसी चव्हाण या शॉर्ट नावाने ओळखले जाणारे गोविंद चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आपलं उभा आयुष्य झिजवलं. गोविंद चव्हाण व मी वर्गमित्र त्यामुळे त्याच्या स्वभावाचा मला जवळून अभ्यास आहे. कृतार्थ जीवन जगताना ते नेहमी दिसले ‘जिंदगी उशीकी है, जो किसी का हो गया! जगण्याचा उद्देश समजला की कर्तुत्व घडतं, कर्तुत्व व नेतृत्व यामुळे गोविंद चव्हाण हे महामेरू झालेले आहेत.
जे न देखे रवी,
ते देखे कवी,
जे न देखे कवी,
ते देखे अनुभवी…
या उक्तीप्रमाणे गोविंद चव्हाण यांचे जीवन समृद्ध झालेले आहे त्यांनी आयुष्यात हिवाळ्यापेक्षा उन्हाळे जास्त पाहिले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या वेदनेची संवेदना त्यांना होती. गोविंद चव्हाण यांचा प्रवास अत्यंत गरिबीतून झाला. गोधड्यापासून गालीच्यापर्यंत जाणारा हा त्यांचा प्रवास ठरला आहे. गालीच्या पर्यंत ते पोहोचले तरी गोधड्याला विसरले नाहीत. म्हणून त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन अनेकांच्या खर्चाचा भार त्यांनी केलेला आहे. शाळा हेच माझे घर असे समजून त्यांनी शाळेमध्ये निष्ठेने काम केलेले आहे म्हणूनच अनेक पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या यशाची गुरुकिल्ली म्हणजे इतराविषयीची तळमळ सदैव अविरत कार्यमग्न आपला शिक्षकी पेशा त्यांनी चोखपणे सांभाळला आहे. अनेक संकटावर मात करून कसल्याही संकटात युधिष्ठिरासारखे स्थितप्रज्ञ गोविंद चव्हाण असतात. स्त्री शिक्षणाकडे गोविंद चव्हाण यांचे अतोनात लक्ष होते म्हणून त्यांनी जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड या शाळेचा कायापालट त्यांनी केला व शाळेसाठी अनेक पुरस्कार त्यांनी मिळवून दिले.
असे जगावे दुनियेमध्ये
आव्हानाचे लावून अत्तर…
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर…
हे त्यांचे नेहमी ब्रिद राहिलेले आहे. जी.सी. चव्हाण हे फुले-शाहू आंबेडकर या चळवळीचे पुरस्कर्ते राहिलेले आहेत. आज माझा वर्गमित्र सेवानिवृत्त होत असताना त्यांची पुढेही विद्यार्थ्यांशी नाळ नक्कीच जुळलेली राहील यात मुळीच शंका नाह. त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा!
-दादाराव आगलावे, मुखेड.
संवाद-9422874747

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *