आदरणीय साहेब आपणा सर्वांचे प्रेरणास्थान कंधार रत्न पुरस्कृत महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ शेकापूरचे संस्थापक अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच कंधार पंचायत समितीचे माजी उपसभापती आपल्या गावचे भूषण आमचे प्रेरणास्त्रोत अखंड ऊर्जावंत आदर्श श्री संभाजीराव पाटील केंद्रे साहेब यांचा आज वाढदिवस
एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले एक असामान्य तेजस्वी व्यक्तिमत्व मन्याड खोऱ्याच्या मातीतील एक रत्न लहानपणापासून समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द धरून खडतर परिस्थितीवर मात करून प्रतिकूल परिस्थितीतही त्याकाळी आपल्यासारख्या सुख सुविधा उपलब्ध नसताना उन्हातानातून पायी चालत नदीतून पोहोच त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं अगदी किशोरवयापासून शेती विषयी राजकारणाविषयी आवड असणारे आपले साहेब थोडं शांत बसणारे होते पुढे ते
जुलमी आणीबाणीच्या काळात सरकारविरुद्ध बंड करणाऱ्या कंधार तालुक्यातील तेरा बहाद्दर सरदारांपैकी एक म्हणजे ते आपले सर्वांचे लाडके बाबा संभाजी पाटील केंद्रे साहेब
महात्मा फुले आंबेडकर शाहू यांना आदर्श मानून विचारात न ठेवता प्रत्यक्ष कृतीत आणून साहेबांनी शिक्षणाविषयी शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून महात्मा फुले ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून त्यांनी महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेकापुर तसेच महात्मा फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय संभाजीनगर कंधार आणि गंगामाता प्राथमिक विद्यालय साठे नगर कंधार या ठिकाणी शाळा काढल्या या शाळेच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची दारे सताड उघडी करणारे ते एक शिक्षण महर्षी ठरले अनेक गोरगरिबांच्या मुलांना घरची भाकर खाऊन शिक्षणाची सोय निर्माण करून दिली तेथून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी उच्च पदावर गेले नोकरीला लागले उद्योगधंदे करू लागले कोणी शिक्षक डॉक्टर इंजिनियर वकील पोलीस अशा अनेक क्षेत्रांमध्ये इथले विद्यार्थी कार्यरत आहेत काही काळ गावातील तरुणांना जिनिंग रेशीम उद्योग यामधून रोजगार निर्माण करून दिला
जीवनात त्यांना अनेक संकटे आली त्या संकटांना खचून न जाता धैर्याने सामोरे गेले आर्थिक परिस्थिती नाजूक असताना साहित्य संमेलनासाठी स्वतःच्या हातातली अंगठी विकून साहित्य संमेलन करणारे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी पैसे नसताना जीवापेक्षा प्यारी असणारी बैल जोडी विकून विज्ञान प्रदर्शन करणाऱ्या आपल्या साहेबांसारखा संस्थाचालक राज्यात दुसरा कोणी नसेल आपल्या साहेबांच कर्तुत्व खूप मोठा आहे सांगण्यासारखं खूप आहे पण वेळेच्या अभावी सांगता येत नाही त्यातीलच एक उदाहरण
भारताच्या नकाशावर अगदी छोट्याशा टिंबाच्या स्वरूपात असणाऱ्या शेकापुर या गावच्या सरपंचाची म्हणजे संभाजी पाटीलकेंद्र साहेबांच्या कामाची दखल घेत आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांनी त्यांच्या पाठीवर थाप टाकून कौतुक करताना टिपलेल्या क्षण
“आदमी ना कद से बडा होता है ना पद से बडा होता है आदमी तो उसकी इन्सानियत से बडा होता है ” या ओळींचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले सर्वांचे लाडके संभाजी पाटील केंद्रे साहेब
पुनश्च एकदा साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐शब्दसंकलन – सौ .रेखाताई शिवाजीराव केंद्रे
ग्रामपंचायत सदस्य शेकापुर,
सहसचिव महात्मा फुले ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ शेकापुर.