(*कंधार : संतोष कांबळे*)
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केले असुन कंधार भाजपच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल काल लागले असुन विधानसभेच्या ७० पैकी ४९ जागेवर भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केले आहे. या विजयाचे भारतीय जनता पार्टी कंधार शाखेच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला. शहरातील महाराणा प्रताप चौकात फटाके फोडून साखर वाटण्यात आली. या वेळी भारतीय जनता पार्टीच्या घोषणा देऊन विजय उत्सव साजरा करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार, माजी जि. प .सदस्य विजय धोंडगे, वेंकट गव्हाणे, भगवान महाराज यास, माजी प.स. सदस्य उत्तम चव्हाण, माजी पं. स. सदस्य सत्यनारायण मानसपुरे, संभाजी घुगे, दत्ता करामुंगे, राजेश गंजेवार, सागर डोंग्रजकर, शरद भागानगरे,प्रवीण बनसोडे, केदार मुत्तेपवार, शैलेश बयास, अनिल मोरे, पांडुरंग वागमारे,भारत पाटिल चिखलीकर, शिवा पाटिल, निरंजन मोरे , चंद्रकांत घोरबांड, मनोहर मंगनाळे, गणेश ठाकुर,सुनिल राठोड यांची उपस्थिती होती.