(कंधार ; दिगांबर वाघमारे)
टेनिस शालेय राष्ट्रीय स्पर्धेत शिवाजी विद्यालय बारुळ च्या रजत पदक विजेत्या विद्यार्थी शिवतेज शिरफुले चा जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते सत्कार सन्मान करण्यात आला .
छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या 68 राष्ट्रीय शालेय टेनिस स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यालय बारूळ येथे इयत्ता दहावी शिकत असलेल्या शिवतेज शिरफुले याने पूर्ण देशाभरातील नामांकित खेळाडूला हरवून द्वितीय स्थान प्राप्त केल्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार ठेबरे ,मुख्याध्यापक अनिल वट्टमवार, कार्यालय अधीक्षक बी बी धोंडगे , क्रीडा शिक्षक डॉ.राहुल वाघमारे, वडील बालाप्रसाद शिरफुले ,आई वैशाली शिरफुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, सचिव गुरुनाथरावजी कुरडे , सहसचिव एडवोकेट मुक्तेश्वर धोंडगे, शालेय समिती अध्यक्ष हनुमंतराव पाटील कळकेकर उपाध्यक्ष संजय पाटील जाधव इत्यादींनी अभिनंदन केले.