महासंघाच्या सर्वंच ग्रुप वर सध्या संघटनात्मक बांधणी व चळवळ अजिबात दिसत नाही.वाढदिवसांशिवाय काही वाचायला मिळत नाहीं.
चळवळ ही जीवंत ठेवण्यासाठी संघर्ष करत रहावा लागतो. वृत्तपत्र बातम्या कात्रणे, निवेदने , बैठका आवश्यक आहेत.
सध्या मुख्याध्यापकांच्या रजा रोखीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खाजगी प्राथमिक शाळा मुख्याध्यापकांना रजारोखीकरणाचा लाभ अनुज्ञेय नव्हता.या प्रश्नावर महाराष्ट्रातून २०११ साली मी व आरीफखान सरांनी मंत्रालयाचे उंबरठे झिजविले.वेगवेगळ्या नेत्यांना व अधिकारी यांना अनेक वेळा भेटलो.पुणे , मुंबई रोजचेच झाले होते.
विशेष उल्लेख करावा लागतो तो कोल्हापूरचे चव्हाण सर यांचा.चव्हाण सरांनी अतिशय चिकाटीने प्रयत्न केला व सहकार्य केले व निर्णय मिळवून घेतला.
यामुळे २०११पासून आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक मुख्याध्यापकांना रजा रोखीकरणाचा लाभ मिळाला.
पण दुर्दैवाने आम्ही खेचून आणलेल्या या यशावर पाणी फेरले आहे.याचे अतिव दुःख होते.
आता या प्रकरणी महासंघाने पेटून उठले पाहिजे अशी अपेक्षा आहे.
जी एस चिटमलवार