Propose Day…

२८ वर्षांपूर्वी मी कोल्हापूरला टेंबलाई हिलवर भर उन्हात दुपारी १२ वाजता सचिनला प्रपोज केलं..
त्याला म्हटलं , तु मला आवडतोस.. माझ्याशी लग्न करशील का ??
पुढे हेही म्हणाले , हो म्हणालास तर ठिक नाहीतर गेलास उडत..
दोघेही सेम वयाचे त्यावेळी आम्ही २२ वर्षांचे होतो.. प्रेम म्हणजे काय हे दोघांनाही कळत नव्हतं.. आणि त्यातून मी एका खेड्यातून आलेली.. अगदीच अल्लड.. पुढे काय वाढून ठेवलं असेल याची कल्पनाही नव्हती.. प्रेम , लग्न हा खेळ नाही तर त्यात बऱ्याच गोष्टी असतात हे बरच उशीरा समजलं आणि प्रेमळ संघर्ष सुरु झाला.. अनेकदा डोळ्यात पाणी आलं तर रोजच आनंदाने न्हाहुन निघाले.. शिक्षण सोडलं तर स्वतःचं घर नाही .. सायकल सुध्दा नाही तर गाडी असण्याचा संबंधच नाही.. बॅंकेत लग्नाच्या वेळी फक्त १७००० रुपये .. याव्यतिरिक्त कुठलीही प्रॉपर्टी नाही.. रेंट ने राहून ११ महिन्याने घर बदललेलं पाहून माझी आई म्हणाली होती , रस्त्यावर काम करणारे कसे बिऱ्हाड घेउन फिरतात तसं फिरत रहा.. मला नक्कीच वाईट वाटलं होतं.. पाठीवर बिऱ्हाड घेउन फिरणारा हा विंचू नव्हता तर उत्तम प्रियकर , उत्तम नवरा , उत्तम निर्व्यसनी आणि उच्च शिक्षीत माणूस होता ज्याने घर नाही तर घरं घेतलीच आणि २१ देश फिरवून आणले आणि त्याहीपेक्षा
मला उत्तम जगण्यासाठी स्वातंत्र्य दिलं.. मी त्याला प्रपोज करुन माझं सुख मिळवलं.. यासाठी खूपच स्ट्रगल करावा लागला पण तो कोणाला चुकलाय…

खूपच सीरीयस झालं का सगळं ?? आता आजची गम्मत सांगते.. आज सकाळी त्यानेच ब्रेकफास्ट केला आणि मी म्हटलं , चल कुठेतरी जाऊ.. तर म्हणतो , इतक्या उन्हात ??.. जरा जोरातच हसले आणि म्हटलं, अरे तुला प्रपोज करतानाही उन्हच होतं तर लगेच म्हणतो , दुपारसाठी भाजी काय आणू सांग ??.. यालाच खऱ्या अर्थाने संसार म्हणत असतील ना..
हेहेहे.. हीच खरी गम्मत आणि हाच खरा आनंद..
सगळ्या गोष्टी कशा बदलतात ना ??.. पण एक हुरहूर आजही राहिली ती म्हणजे मला प्रपोज कोणी केलं नाही कारण मी सचिनला केल्यामुळे तो चान्स मी गमावला पण सगळं कसं मिळेल ना ??.. मुलं मागे फिरताना मुली माज दाखवतात तो राहिलाच ना राव.. पण तरीही आजचं उन्ह त्यावेळी चांदणं भासत होतं..
तो आहे म्हणुन मी जगतेय आणि त्याने स्वातंत्र्य दिलं म्हणुन खऱ्या अर्थाने श्वास घेतेय..

पैसा , प्रॉपर्टी आमच्यासाठी कधीच महत्वाचा नव्हता आणि नाही पण घरात असलेली त्याची आणि माझी मैत्री , विश्वास हाच नवरा
बायकोच्या नात्यातील दुवा आहे तो जपत असताना बाकी गोष्टी शुल्लक वाटतात..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *