तर रामसिंग चव्हाण यांनी ११ सीसीटीव्ही कॅमेरे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पोलिसांना स्वाधीन..
नांदेड :आमदार श्रीजया चव्हाण यांनी
मुदखेड शहरातील मुख्य बाजारपेठ भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पाच लक्ष रुपये मदत जाहीर केल्यानंतर युवा कार्यकर्ते रामसिंग चव्हाण यांनी सुद्धा एक लक्ष रुपयाची 11 सीसीटीव्ही कॅमेरे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक सप्रे व उपनिरीक्षक कांबळे यांना 11 सीसीटीव्ही कॅमेरे स्वाधीन करण्यात आले आहे.
शहरात वाढते गुन्हेगारी या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठ भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची संकल्पना आमदार श्रीजया चव्हाण यांनी हाती घेतली असून या संकल्पनेची सुरुवात मुदखेड शहरातील पाच लक्ष रुपये निधी खर्च करून जवळपास 55 सी सी टीव्ही मोठे कॅमेरे बसविण्याचे जाहीर केले आहे.
भोकर मतदारसंघाचे आमदार
आमदार श्रीजया चव्हाण यांनी निवडून आल्यानंतर या मतदारसंघातील नवीन दिशा देण्याची संकल्पना हाती घेतले असून प्रथम जिल्हा परिषद शाळा त्यानंतर युवकांना रोजगार मिळावा म्हणून प्रत्येक शहरात युवकांचा मेळाव्याचा आयोजन करत आता मुदखेड शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची संकल्पनेतून
पोलिसांना गुन्हेगारांना पकडण्यासाठी नक्कीच आळा बसणार असं चित्र दिसत आहे.
पोलीस निरीक्षक सप्रे हे रुजू होतात नगर परिषद मुख्याधिकाऱ्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची अनेकदा मागणी केली होती परंतु पालिकेवर प्रशासक असल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे शहरात बसविण्यासाठी निवडणुकीनंतर घेण्यात येईल असं सांगण्यात आल्यानंतर या भागाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी पाच लक्ष मदत जाहीर केल्यामुळे पोलीस निरीक्षक सप्रे व उपनिरीक्षक कांबळे यांनी खासदार अशोकराव चव्हाण व आमदार श्रीजया चव्हाण यांचे आभार मानले.
याप्रसंगी माजी आमदार भाजप नेते अमरनाथ राजूरकर, भाऊराव कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक सप्रे, उपनिरीक्षक कांबळे, रामसिंग भीमराव चव्हाण ,उत्तमराव देवसिंग चव्हाण, माधव कदम ,सुनील शेट्टे , संजय आऊलवार , श्याम चंद्रे , बजरंग खोडके , मारोतराव शखंतिर्थकर, कपिल लोखडे, बबलू जानीमिया, विनोद चव्हाण, पिंटू ठाकूर यांच्या सह अदी उपस्थित होते