(कंधार ; दिगांबर वाघमारे )
बदलत्या जिवनशैलीत जंकफुड खाण्याच्या सवयीमुळे आपल्या आहारातून पोष्टीक तृण धान्याचा वापर कमी होत चालला आहे.खरेतर तृणधान्याचा उपयोग रोजच्या उर्जेच्या गरजा भागविण्यासाठी होणे आवश्यक असल्यामुळे शालेय जीवनात तृणधान्य व त्याची पोष्टिकता यांचे महत्व कळावे म्हणून कंधार शिक्षण विभागाच्या वतीने दि .२८फेब्रुवारी रोजी गटसाधन केंद्र येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्ग कंधार येथे तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा व शालेय पोषण आहार पात्र खाजगी शाळेत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस,माता पालक, व नागरिकांनी सहभागी नोंदवला होता .
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्ग शासन निर्णयाच्या अनुषंगाने तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता गशिअ कार्यालय कंधार येथे गटशिक्षण अधिकारी संजय येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.शालेय पोषण आहार अधिक्षक वर्ग – २ सुरेश जाधव पाटील यांनी सदरील स्पर्धचे नियोजन केले होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कंधार तालुकाध्यक्ष मिर्झा जमीर बेग , शिक्षण तज्ञ आनंद तपासे , मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे , राजू बोरकर ,शिवाजी पाटील डिकळे आदीसह पालकांची उपस्थिती होती . मोड आलेले कडधान्य , धिरडी , पापड , अंडापुलाव , ईडली , डोसा , नाचणी सत्त्व भाकरी , विविध प्रकारच्या चटणी , सालाड आदी रूचकर स्वादिष्ट पदर्थाची चव परीक्षकांनी चाखून गुणदान केले तसेच उपस्थितांनी या सर्व अन्नपदार्थ चव घेतली .