काल आम्ही चार फ्रेन्ड्स लोणावळ्यात गेलो होतो.. त्यातील तिघांना लोणावळ्याची फार काही माहिती नव्हती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.. जाताना मनशक्तीला थांबून खाऊन जायचे ठरले.. लोणावळ्याचा टोल क्रॉस केला कि लगेचच मनशक्ती आहे तिथली पुरणपोळी आणि थालीपीठ म्हणजे स्वर्गीय सुखाची अनुभूती.. जिभेवर ठेवली कि पुरणपोळी विरघळते.. त्यांचे उकडीचे मोदकही खूप छान असतात.. नक्की खाऊन पहा..
तिथे जाऊन मनसोक्त खाऊन आम्ही लोणावळा लेक ला जायचा प्लॅन केला.. दरवर्षी मी तिथे जाते तरीही रुट लक्षात नव्हता.. मैत्रीणीला म्हटलं , लोणावळा लेक मॅपवर लाव.. तिने मॅपवर लावताच आम्ही वेगळ्याच ठिकाणी गेलो.. तिथे गेल्यावर मी म्हटलं , हि ती प्लेस नाही .. मग गाडी थांबवून एकाला विचारलं , तर त्यांनीही तीच जागा सांगितली जी आम्ही मॅप वर शोधत होतो.. मग एका रीसॉर्ट पाशी गाडी थांबवली आणि वॉचमनला विचारलं, दादा लोणावळा तलावापाशी जायचे आहे.. त्यांनीही सेम प्लेस दाखवली .. मग मी त्यांना मला अपेक्षित जागेबद्दल वर्णन करुन सांगायला लागले.. तिथे बसायला पायऱ्या आहेत आणि बाग आहे वगैरे.. ते वॉचमन दादा म्हणत होते तुम्हाला खंडाळा लेक ला जायचे आहे का ?? .. मला वाटलं , खंडाळा तलाव खंडाळ्यात असेल आणि आपण लोणावळ्यात आहोत त्यामुळे आपण लोणावळा तलाव पहायला जाणार आहोत.. त्याच्याशी पाच मिनिटे प्रेमळ पुणेरी संवाद झाल्यावर ते म्हणाले , अहो मला इथलं जितकं माहित आहे तितकं कोणालाच माहीत नाही.. तरीही आम्ही पुणेकर आमच्या मतावर ठाम.. पुढे जाऊन रिक्षावाल्याला म्हटलं , खंडाळा तलाव कुठे आहे ?? त्याने डावीकडे जायला सांगितले आणि गूगल बाई खंडाळा लेक ला आम्हाला घेउन गेली .. तिथे गेल्यावर लक्षात आलं कि लोणावळ्यातच खंडाळा तलाव आहे.. हेहेहे.. अरे यार यात आम्हा पुणेकरांची काय चूक ??,, लोणावळ्यात खंडाळा तलाव असं कुटं असतय व्हय ??? पण एक गोष्ट बरोबर आहे आणि ती म्हणजे आमच्या पुण्यात नाही का झेड ब्रीज आहे ज्याचा पुण्याच्या मानसिकतेशी काय संबंध ??
लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा
कुटं कुटं जायचं हनीमूनला हे गाणं आठवलं
आणि वाटलं कुठं पण जा कारण दोन्ही जागा कनेक्टेडच आहेत… जसं पुण्यात आमच्यासारखे पुणेकर रहातात जे स्वतःचच खरं करतात.. हेहेहे.. तिथे गेल्यावर जो काही सुकून मिळाला ना तो अवर्णनीय आहे.. जवळपास ६ वाजत आले होते .. आम्ही तिकीटे काढून बोटींगचा आनंद घेतला.. कारंज्याशेजारुन जाताना अंगावर उडणारे पाण्याचे तुषार रोमांचित करत होते.. सुर्यास्त झाला कि त्या प्रकाशात सुंदर फोटो येतात त्यामुळे मनभरेपर्य्नत फोटो काढले आणि रील्स केली.. आणि लोणावळा चिक्की घेउन घरी परतलो.. असे हे पुणेकर मी म्हणेन तीच पूर्वदिशा म्हणणारे आणि तोंडावर पडणारे आणि समोरच्याला पाडणारेही..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist