धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे )
येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयात दि 28 फेब्रु 25 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ होळंबे टी ए मील यांची उपस्थिती होती. प्रा डॉ सिरसाठ डी बी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या शरीरात सकारात्मक उर्जा आणि नकारात्मक उर्जा भरली आहे. आपण जसा विचार करतो तसं शरिरातील द्रव स्तृवायला लागतात असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांनी रमण इफेक्ट वाचवून आणि समजून सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा मुंडे जी एस यांनी केले तर आभार प्रा डॉ सौ शिंदे एस वाय यांनी केले.