नांदेड : देगलूर – बिलोली मतदार संघात राजकीय भूकंप झाला असून, काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आ. जितेश अंतापूरकर यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे व शिवसेना उबाठा गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात आज जाहीर प्रवेश केला आहे. या ऐतिहासिक घडामोडीमुळे देगलूरात भाजपची ताकद वाढली असून, आ. अंतापूरकर यांचे राजकीय प्राबल्य अधिक दृढ झाले आहे.
माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते आशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ सुरू झाली होती. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात होते. दरम्यान, आ. जितेश अंतापूरकर यांच्या निर्णायक खेळीमुळे आणि त्यांच्या प्रभावी संघटन कौशल्यामुळे मोठ्या संख्येने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उबाठा गटाचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक भाजपमध्ये सामील झाले आहेत.
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती महिला मंडळाच्या सभागृहात आज शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता भाजप पक्ष प्रवेश सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. याप्रसंगी देगलूर मतदार संघाचे आ.जितेश अंतापूरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.संतुक हंबर्डे, प्रविण साले, एकनाथ पवार, विजय गंभीरे,माजी सभापती माधवराव मिसाळे गुरुजी, बळेगावकर देशमुख,बालाजी पाटील पांडगळे, ऍड. रामराव नाईक, भावनाताई काशेटवार,अनिल पाटील खानापूरकर, शिवकुमार डाकोरे, मनोज राजुरकर, अमित बोंडलावार, अनिल बोंडलावार, यशोदीप कुंभारे, प्रशांत दासरकर, शंकर कंतेवार, जनार्दन बिरादार, बालाजी महिलागिरे,यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.या पक्षप्रवेशामुळे माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण आणि आ. जितेश अंतापूरकर यांच्या जोडीला जिल्ह्यात अधिक बळ मिळाले असून, भाजपला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मोठा फायदा होणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेसची अवस्था दयनीय झाली असून, काँग्रेस नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
आ. जितेश अंतापूरकर यांनी यावेळी नवा विश्वास आणि नव्या संधीचे स्वागत करत पक्षबांधणीसाठी कटिबद्ध राहण्याचे संकेत दिले. या घडामोडींमुळे देगलूरचे राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून, भाजप अधिक मजबूत झाला आहे.भाजपच्या या आक्रमक खेळीमुळे काँग्रेस नेतृत्व हादरले असून, जिल्ह्यातील अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आणखी भाजपच्या दिशेने वाटचाल करू शकतात, अशी जोरदार चर्चा सद्या सुरू आहे. आगामी काळात नांदेड जिल्ह्यातील राजकीय वातावरण अजून रंगतदार होणार, हे नक्की !.
पक्षाची मेंबरशिप असणाऱ्यांनाच आगामी
निवडणुकीत संधी – अशोकराव चव्हाण
यावेळी माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण मार्गदर्शन करताना म्हणाले की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मागील विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला जिल्ह्यातील देगलूर आणि भोकर सह पाच जागा मिळाल्या. तेलंगणातील काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी पूर्णता जोर लावल्यानंतर देखील केवळ जनमताच्या रेट्यामुळे ४४ हजारांच्या मताधिक्क्यांनी आपल्या जागा निवडून आल्या. ही विजयाची शृंखला याही पुढे कायम राखण्यासाठी आपल्याला एकोप्याची ताकद दाखवावी लागणार आहे. त्यासाठी प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत जनतेशी संपर्क असलेल्या कार्यकर्त्यालाच संधी मिळेल. आगामी काळात मतदार संघांची पुनर्रचना अपेक्षीत आहे. त्यामुळे साहजिकच मतदार संघ आणि आमदारांची संख्या वाढणार आहे. त्यामध्ये महिलांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व द्यायचे आहे.मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक समाजातील लोकांना देखील जोडायचे आहे. अशा प्रकारे सर्वांना एकत्रित आणून आपल्याला एकोप्याचे वातावरण निर्माण करायचे आहे. पक्षाची ज्यांच्याकडे मेंबरशिप आहे, अशानाच आगामी निवडणुकीत संधी मिळणार आहे. लोकांचा अधिकाधिक संपर्क असणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट ( उमेदवारी) दिली तर आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला निश्चितपणे बहुमत मिळणार आहे, असा विश्वास देखील माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला आहे. प्रारंभी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे
शिवकुमार डाकोरे ( राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सचिव), माधव पाटील केरुरे ( सुगाव), उमाकांत भुताळे ( भुतन हिप्परगा), खालेद चाऊस ( तडखेल), शिवराज बामणे, संभाजी बामणे, शुभम पाटील केरुरे, संभाजी सुकने, प्रशांत खिरपे, सुधाकर पाटील भक्तापूर ( काँग्रेस ता. उपाध्यक्ष) , भास्कर पाटील ( सरपंच केदारगुंठा ),रमेशराव पाटील ( वन्नाळी माजी सरपंच ),मारोती हाणेगावे (चैनपूर उपसरपंच प्रतिनिधी ),माधवराव पाटील (सांगवी उ.माजी उपसरपंच ),हाणमंतराव धडेवार (सांवगी उ.उपसरपंच),गणेश माधवराव पाटील (मंडगी सरपंच), माधवराव माणिकराव (मंडगी माजी सरपंच / चेअरमन), उमाकांत विठ्ठलराव काळेसे (मंडगी माजी सरपंच),मारोती सुरेश पाटील,शंकरराव गिरप्पा पाटील,(कुरूडगी बु.सरपंच),सदाशिवराव शंकराव पाटील (कुरूडगी बु.माजी सरपंच ),प्रकाश तुकाराम पाटील(टाकळी वडग),सुरेश संतुकराव पाटील (लख्खा सरपंच),शिवकुमार विश्वनाथ गुत्ते (तमलूर),बालाजी नरसिंगराव सुरनर (तमलूर),निळकंठ मोगलप्पा पाटील (सुंडगी बु.चेअरमन),हणमंतराव इरवंतराव भोकसे (शेवाळा माजी सरपंच ),गोविंदराव काशप्पा पाटील ( सुंडगी बु.माजी चेअरमन ),अमृतराव सोपानराव पाटील(आलूर भारतीय मराठा महासंघ जिल्हा सचिव),अर्जुन पाटील (नंदूर माजी सरपंच),हणमंतराव जाकुरे (नंदूर माजी उपसरपंच),पांडूरंग गंगाराम पाटील ( नंदूर माजी सरपंच ),बसवंत निळकंठराव पाटील (नंदूर माजी चेअरमन ),बालाजी पाटील शेकापुरे,आनंदा सखाराम पाटील (नंदूर माजी उपसरपंच),भास्कर पाटील ( केदारकुंठा सरपंच) ,शंकरराव बाबाराव केरुरे
मार्तंड लच्छीराम (सुगाव),गिरीधर पंडीतराव बामणे
गणेश पाटील खिसे,रामराव लक्ष्मण बादावाड,माधव शंकर गोणेवाड, रामदास पाटील,चंदररेड्डी नागरेड्डी पंगे
(मानूर सरपच),भास्कर पंढरी पाटील (ढोसणी सरपंच), इश्वर मारोती दंडलवार (भक्तापूर सरपंच),नारायण मुडे (वळग माजी सरपंच),राजू बंडे (बिजलवाडी शालेय समिती अध्यक्ष ),रमेश तेजेराव पाटील (वन्नाळी चेअरमन),बंडेप्पा स्वामी (ग्रा.पं. सदस्य),भीमराव माळगे (ग्रा.पं.सदस्य),हाणमंत भुताळे,सोमनाथ स्वामी,विठ्ठल बिरादार, शिवाजी मदने, विठ्ठल बिरादार,सुभाष हते,सुरेश कवटगे, सुभाष पाटील ( माजी तंटामुक्ती अध्यक्ष),दत्ता पताळे,अंगद बिरादार,भरथ जिवबा,हणमंत स्वामी,नागरेड्डी गंगारेड्डी तोरनावे,श्रीनिवास व्यंकटराव नाईक,राजेंद्र शंकर बंन्डे,बस्वराज नागशेट्टी किरसंबरे,नागनाथ आडेप्पा बिरादार,ज्ञानेश्वर इश्वर सुर्यवंशी,व्यंकटरेड्डी नागरेड्डी दौगाले, नरसारेड्डी देवारेड्डी अंबाटे, बिरादार सूर्यकांत,विनोद व्यंकटराव होंडगीरे,देविदास संग्राम पवार,शेखर पाटील,योगेश बिरादार,चेतन पाटील,हणमंत एकंबे संदिप बिरादार,बळवंत बिरादार,तानाजी विरगोंदळे,अंकुश चोपडे, संगमेश हुग्गे,केशव पाटील, व्यंकट रेड्डी डोंगाले,छगामोडी वासरे,अंतोबा अपाणे,ज्ञानु सुर्यवंशी,संजय मॅकलवार यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण यांनी भाजपाचे उपरणे पांघरूण त्यांचे पक्षात स्वागत केले.