(कंधार ; दिगांबर वाघमारे )
दि:-०१ मार्च २०२५ रोजी मा.मंत्री मोहदय,सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण,महाराष्ट्र राज्य,यांनी दि:-१८/०२/२०१५ रोजी “राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम”मोहीम राबविणेबाबत दिलेले निर्देश तसेच मा.आयुक्त,आरोग्य सेवा तथा अभियान संचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान,मुंबई यांनी दि:-२१/०२/२०२५ व्हिडिओ कॉन्फरन्स (VC) द्वारा दिलेल्या सूचना.त्यानुसार सदर मोहिमेचा शुभारंभ संपूर्ण राज्यामध्ये दि.०१/०३/२०२५ रोजी इंदिरा गांधी मॉडेल स्कुल औंध,पुणे,येथून श्री.मा.ना.अजितदादा पवार साहेब, मा.उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व मा.ना.श्री.प्रकाश आबिटकर साहेब,मा.मंत्री,सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मोहदयांच्या हस्ते सकाळी ठिक.८:३० वा पुणे येथे राज्यातील सर्व जिल्हे “राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम”(RBSK)अंतर्गत उद्धघाटन सोहळ्यास व्हिडिओ कॉन्फरन्स (VC) च्या माध्यमातून सदरील उद्धघाटन सोहळ्यास उपस्थित होते.तसेच नांदेड जिल्ह्याचे
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर,व डॉ. राजाभाऊ बुट्टे,निवासी वैद्यकीय अधिकारी,नांदेड यांच्या आदेशानुसार दि:-०१/०३/२०२५ रोजी कंधार तालुका स्तरीय उद्धघाटन मनोविकास विद्यालय सुल्तानपुरा,कंधार येथे कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. किशोर कदम,सौ.वरवंटकर.एस.जी.(मुख्याध्यापक), मनोविकास विद्यालय सुल्तानपुरा,कंधार यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला.यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी “राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम” पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत मोरे ,डॉ शाहीन मॅडम डॉ.गजानन पवार ,डॉ.उजमा तब्सुम ,डॉ.अरुणकुमार राठोड डॉ.नम्रता ढोणे,यांच्या मार्फत ० ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची वजन, उंची,घेऊन एकूण पट संख्या:-५१६ पैकी ४७४ मुले,मुली यांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली,नेत्रदोष,रक्तक्षय चाचणी करण्यात आली ६२ किरकोळ आजारी विद्यार्थ्यांना औषधोपचार देण्यात आले तसेच संदर्भसेवेसाठी ०८ पात्र विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.तसेच कर्मचारी श्री.शंकर चिवडे,श्री.दिलीप कांबळे,(औषध निर्माण अधिकारी),श्रीमती.सुनिता वाघमारे,सुरेखा मैलारे (परिचारिका) तसेच आरोग्य तपासणी दरम्यान शाळेचे सहशिक्षक यांचे सहकार्य लाभले.