कंधार ; प्रतिनिधी
भारतीय लहुजी सेना संस्थापक अध्यक्ष व्ही.जी.रेडी( वय 70 वर्षे ) यांचे दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी वृद्धपकाळाने मुंबई येथे निधन झाले .दिनांक 5 मार्च 2025 रोजी त्यांच्यावर मुळगावी मौ .टाकळी (तालुका नायगाव , जिल्हा नांदेड ) या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. व्ही.जी.रेडी यांच्या पक्षात पत्नी , मुलगा ,नातवंडे असा परिवार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाच्या तरुणांना दिशा देण्याचे व न्याय मिळवून देण्याचे कार्य भारतीय लहुजी सेना महाराष्ट्र या संघटनेच्या माध्यमातून व्ही.जी.रेडी यांनी केले .
त्यांच्या या निधना बद्दल दि.2 मार्च रोजी सकाळी कंधार येथे भारतीय लहुजी सेना शाखा कंधारच्या वतीने तालुका अध्यक्ष राम नवघरे यांच्या अध्यक्षतेखाली लहुजीनगर कंधार येथे श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आली. यावेळी मातंग समाजातील मंडळी उपस्थिती होती.चार दशके सातत्याने मातंग समाजाच्या प्रश्नांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर चळवळ उभी करणारे व आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी सहभाग व पुढाकार घेऊन मार्गदर्शन करणारे नेते मा.व्ही.जी रेड्डी साहेब होते त्यांच्या निधनामुळे समाजात वैचारिक पोकळी निर्माण झाली असे मनोगत व्यक्त करण्यात आले .