(कंधार ; दिगांबर वाघमारे )
8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कंधार येथील विवेकानंद लेक्चर कॉलनी शारदा ग्रुपच्या वतीने कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांचे उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून स्टॉल वाटप करण्यात आले व फळे पण देण्यात आले.
शिंदे मॅडमनी आपले मनोगत व्यक्त करतांना महिलांचा सन्मान हा महिला दिनापुरताच नसावा तर रोज महिलांचा सन्मान व्हावा. कष्टकरी महिलांचा सन्मान ही संकल्पना आशाताईंनी आम्हाला दिली असेही म्हटल्या. कुरुडे मॅडमनी पण मनोगत व्यक्त केले त्यावेळेस त्या म्हटल्या की कष्टकरी महिलांना पण सर्वांनी चांगली वागणूक द्यावी. आशाताई पण यांनी मनोगत व्यक्त केले जिजाऊंनी शिवरायांना जसे संस्कार दिले तसे परस्त्री ही आपली माता आणि बहिणी समान आहे असे आज प्रत्येक स्त्रीने मुलाला संस्कार दिले पाहिजे. त्यामुळे देशामध्ये बांगलादेश सारखी अत्याचाराची घटना पुन्हा घडणार नाही,असे पण म्हटल्या आणि सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित महिला सौ.राजश्री शिंदे मॅडम, सौ.कुरुडे मॅडम, सौ.आशाताई गायकवाड ,अनुसया पुलकुंडवार , सौ.मनीषा कुलकर्णी , सौ.पुनम शिंदे , सौ.शिवानी लुंगारे, सौ.मनीषा कुरूडे ,सौ.रूपाली पदमवार, सौ. कोमल पुलकुंडवार , सौ,भांगे ताई, सौ.तृप्ती नळगे, सौ.शेंडगे ताई , पंचफुला लुंगारे यांची उपस्थिती होती .
8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आलेल्या महिलांमध्ये ज्योती पेटकर, राणी दिपकर, पुष्पा बोधनकर, पिंकी दीपकर , राणीताई , सविताताई , पद्माताई , मीनाताई आदी महिलांचा सन्मान करण्यात आला .अशा तऱ्हेने महिला दिन संपन्न झाला.