कंधार ; प्रतिनिधी
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालात कंधार येथुन डॉ. उमाकांत बिराजदार यांची उमरगा येथे बदली झाली होती या कारणास्तव देगलुरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ रमेश गवाले यांना कंधारचा प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून स्वीकारला होता.
यापूर्वी डॉ सुनिल दासरे हे अहिल्यानगर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्य केले असून त्यानंतर अहमदपूर येथे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते अहमदपूर येथून त्यांची बदली कंधार येथे झाली असून त्यांनी कंधार चा तालुका आरोग्य अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला .
यावेळी डॉ. सुनील दासरे यांचा तालुका आरोग्य आधिकरी कार्यालयातील आरोग्य सहाय्यक व्यंकटी शेळके, लेखापाल राम प्रेमलवाड यांनी शाल पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी डॉ .श्रुती कौरवार, बालाजी कल्लाळे आरोग्य सहाय्यक, अविला इंगोल आरोग्य सहायिका, जी.एस.मलवाडे ,काष्टरोग तत्रंज्ञ एकनाथ पठाडे, तालुका समूह संघटक सुशील आलेगावकर, बालाजी काकडे लसीकरण सह नियंत्रक, सचिन मुंडे वरिष्ठ सर्व प्रयोगशाळा पर्यवेक्षक, दिगंबर मुसळे क्षयरोग तंत्रज्ञ ,ॲड सिध्दार्थ वाघमारे आदीची यावेळी उपस्थिती होती .