कंधार ; प्रतिनिधी
तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्र चालक खताचा व बियाणाचा बनावट तुटवडा करून चढ्या दराने विक्री करण्याचे प्रकार करतात ,कोणत्या कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये यासाठी तहसीलदार व कृषी अधिकारी यांनी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी दि .३० रोजी माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, पावसाळ्याच्या अगोदरच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना शेतीची कसल्याच प्रकारची मशागत करू दिली नाही. त्यामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत सापडला आहे. दरवर्षी काही कृषी सेवा केंद्रांकडून मनमानीपणे खत व बियाणाचे चड्या दराने विक्री केल्या जात असल्याचे अनेक प्रकरण समोर आले आहेत. या पेरणीच्या दिवसात शेतकऱ्याची अडचण होऊ नये त्यांना शासनाच्या नियमानुसार खत व बियाणे योग्य भावात मिळावे यासाठी संबंधित विभागाने उपाययोजना कराव्यात. यामध्ये
खत व बियाण्याचे भाव फलक दर्शनीय भागात लावण्यात यावे, कृषी अधिकारी यांनी कृषी सेवा केंद्राच्या गोदामामध्ये खत व बियाणे किती उपलब्ध आहे याची रोज पाहणी करावी. प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. शेतकऱ्यांना खत व बियाणे खरेदी केल्यानंतर त्यांना बिल देण्यात यावे.खत बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांना कोणत्याच नियम व अटी लावू नये.
अशी मागणी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावर प्रशासन कमी पडण्यास माजी सैनिक संघटना यावर लक्ष ठेवून असणार आहे.
कोणताही कृषी सेवा केंद्र मालक चढ्या दराने खत व बियाणे विकत असेल किंवा खत व बियाणे देत नसेल तर माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले .


