*तालुका प्रतिनिधी ; संतोष कांबळे*
विदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणे ही एक सामान्य भावना आहे. अनेक विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असतात, पण या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवणे सोपे नसते. परदेशात शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणी आणि आव्हाने असतात या अडचणींना, आव्हानाना तोंड देत आपल्या उराशी बाळगलेले स्वप्न आज सत्यात उतरणार आहे.
साधारण घरातील, सामान्य परिस्थितीत वाढलेला नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव येथील जिल्हा परिषद शाळेत दहावीचे शिक्षण घेऊन उच्च शिक्षणाची स्वप्न कुरेशी बाळगून जय सुभाष वगरे हा उच्च शिक्षणासाठी सामान्य कुटुंबातील मुलगा आज उच्च शिक्षणासाठी लंडनकडे निघाला आहे. त्याच्या घरात श्रीमंती नव्हती, पण शिक्षणाची कास कधी सुटली नाही. परिस्थितीने अनेकदा पाय ओढले, पण त्याच्या जिद्दीने आणि चिकाटीने त्याला पुढे जाण्याचं बळ दिलं. आई-वडीलांनी त्यांच्या परीने सर्वस्व पणाला लावलं. काहीवेळा स्वतःच्या गरजा मागे टाकून, त्याला पुस्तकं, फी, आणि शिक्षणाच्या सर्व गरजा भागवायला त्यांनी अपार कष्ट घेतले. त्याच्या प्रत्येक यशामागे त्यांच्या अश्रूंची आणि त्यागाची कहाणी लपलेली आहे. त्यांनी फक्त मुलाला शिकवलं नाही, तर त्याच्या स्वप्नांवर विश्वास ठेवला आणि तो विश्वास आज फळाला आला आहे.
जयचे दहावीपर्यंतचे शिक्षण नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेत मराठी माध्यमातून झाले. जयच्या उच्च शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला.
जिल्ह्यातील नामांकित यशवंत विद्यालयात बारावीत चांगले गुण घेऊन तो उत्तीर्ण झाला.
आपल्या मुलाची शैक्षणिक प्रगती पाहून आई नंदा सुभाष वगरे आणि वडील सुभाष वगरे यांनी आपल्या हालाखीच्या परिस्थितीत जय ला पदवी शिक्षणासाठी विद्येचे माहेरघर असलेले पुणे येथे प्रवेश घेतला.आज जय सुभाष वगरे हा लंडन येथे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ही एक व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी चे शिक्षण घेण्यासाठी जात आहे
हा क्षण फक्त त्या मुलासाठी नाही, तर प्रत्येक आई-वडिलांसाठी गर्वाचा आहे. गरीब घरातून शिकून मोठं होण्याचं स्वप्न आता हळूहळू सत्यात उतरू लागलंय. त्याचं लंडनला जाणं ही केवळ एका व्यक्तीची प्रगती नाही, तर हे हजारो मुलांसाठी प्रेरणादायक उदाहरण आहे की, परिस्थिती काहीही असो — जर इच्छाशक्ती असेल, मेहनत आणि घरच्यांचं साथ असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.आज त्याला आशीर्वाद देताना डोळे भरून येतात. त्याच्या या प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा — तो अधिक शिकून, अधिक मोठा होऊन परत यावा आणि आपल्या देशाचं नाव उज्वल करावं, हीच प्रार्थना.

