फोटोग्राफी ही कला असली तरीही न शिकता ती अनेकांना जमते आणि बऱ्याच जणाना शिकवूनही जमत नाही.. इतर अनेक कलाही अशाच आहेत..
बऱ्याचदा मला विचारलं जातं , तुमचे फोटो कोण काढतं ??.. याचं उत्तर आहे कधी नवरा , कधी प्रोफेशनल फोटोग्राफर आणि ९०% मित्र.. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत मित्राचा मोलाचा वाटा आहे.. काही जणाना मी काही ॲंगल शिकवले , काहीना थोडं फार जमलं तर काहीना अजिबात जमलं नाही कारण मुळात शिकण्याची वृत्ती हवी आणि आवडही हवी.. बरेच ठोंबे असे आहेत कि त्यांना कशातच रस नाही अशावेळी त्यांच्याकडे पाहून वाटतं , हे का जगत असतील आणि कशासाठी ??.. ठेविले अनंते तैसेची रहावे .. अजिबात क्रिएटिव्हीटी नाही , कशात नावीन्य नाही.. कशात रिस्क घ्यायची नाही फक्त गाढवासारखं काम करत रहायचं आणि आलेला दिवस ढकलून लाखभर रुपये घरात येतात यावर यांचा आनंद अवलंबून असतो..
याउलट माझे काही मित्र असे आहेत कि रोज नवनवीन आयडियाज घेउन जगतात आणि त्याच आयडिया फोटो काढताना आम्ही अमलात आणतो.. अनेक रिल्स पाहुन आम्ही त्यातून काहीना काही शिकतो अगदी कालचेच उदाहरण देते, यलो सारीवर केलेलं रील , जे आम्ही पाबे घाटात शुट केले आहे.. ज्यात आम्ही दोघांनी काही गोष्टी ठरवुन केल्या आहेत. आम्हाला उतारावरुन वहाणारं पाणी आणि त्यावर पावसाचे थेंब टिपायचे होते त्यानंतर त्यावरून चालताना तिथे काही पाने , फुले हवी होती . त्यासाठी कॅमेरा ग्राउंडला लावला होता.. एखादा अभिनेता/ अभिनेत्री उंचीला कमी असते त्यावेळी कॅमेरा असा लावला जातो अर्थात त्याला अजून खुप वेगळे ॲंगलही आहेत.. आम्ही इतक्या पावसात फुलांवर लक्ष ठेवून होतो.. जशी आम्हाला बोगनवेल दिसली तसा मित्र खाली उतरला आणि फुलं., पानं घेउन आला आणि तेही आवडीने .. यलो सारी हाही त्याचाच चॉइस होता आणि त्यानंतर ती ग्रीनरी आणि मग माझी क्रिएटीव्हीटी , मग ते केसात मोठं फुल असेल , कॉंट्रास ब्लाउज असेल ,सारी नेसण्याची पध्दत ती कॅरी करतानाची स्टाईल आणि हावभाव.. आपल्याकडे असलेलं पोर्ट्रे करणं आणि जे नकोय दाखवायला ते हाईड करणं हा कलाकाराचा मोठा अभ्यास असतो.. अर्थात फार कमी वेळा आम्ही रील्स ठरवुन करतो.. बऱ्याचदा अनेक गोष्टी नैसर्गिक असतात .. मला हवं असलेलं आणि डोक्यात असलेलं अगदी सहज मिळतं त्यानंतर मी माझी क्रीएटिव्हीटी वापरुन त्याला मज्जा आणते ..आम्ही जिथे जातो तिथे काहीना काही सापडतच आणि फोटोग्राफी सुरु होते.. दोन / तीम मित्र असे आहेत कि त्यांना ॲंगल किवा लाईट सांगावं लागत नाही .. ते प्रोफेशनलसारखे ॲंगल घेउन नैसर्गिक कुठलाही फिल्टर न वापरता आणि मेकअप तर अजिबात नाही म्हणजे मला आवडतच नाही.. मी जशी आहे तशी रॉ समोर जाते आणि उत्तम काहीतरी मिळतं.. लहानपणीचा माझा एकही फोटो नाही कारण कॅमेरा नव्हता .. माझ्या आत्याच्या हबीला आई म्हणालीहोती , पोरांचे फोटो काढा हो?? .. तेव्हा त्यांनी आम्हाला समोर बसवलं आणि म्हणाले होते , कॅमेरा बिघडला.. खरं खोटं त्यांनाच माहीत आणिआता रोज फोटोग्राफी सुरु असते.. काही कारणाने का असेना आज त्या काकांची आठवण येते .. त्यांची कृतज्ञता व्यक्त करते .. काही गोष्टी आपल्या मनावर खोलवर रुजलेल्या असतात त्यातून सुड न घेता स्वतःला सिध्द करून दाखवायचं असतं कारण स्वतःला घडवण्यासाठीच हे धडे असतात..
Life is beautifull.. फक्त प्रत्येक घटनेकडे सकारात्मकतेने पहा आणि प्रत्येक घटना चॅलेंज म्हणुन स्वीकारा..
https://www.facebook.com/sonal.s.godbolehttps://www.instagram.com/godbolesonal?igsh=Y3dvazd0Y3UzcW84
https://youtube.com/@sonalcreations2874?si=jP6Ft3TECNOcUi_n
#SonalSachinGodbole
#Reel_Master
#YouTuber
#Publishersonalcreations
#कुंपणावरचासरडाकादंबरी, #कामिनीकादंबरी, #सहजसोप्पं, #संस्कारवेल, #मुलीची आई, #नैराश्यातुनसकारात्मकता, #आईमुलगानातंसंस्कार , #सखी,
#अध्यात्मआणिगैरसमज, #एक सुंदर सत्य
#AnimalCommunicator
#SonalCreations – my YouTube channel
#SexEducation as a counselor
#ProudToBeATranswoman – book
#Beyondsex – novel
#Fantasies_And_Beauties_In_Sex – novel
#Anira – novel
#Indradhanu – book
#13000km – my life journey book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marital_affairs
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi – चारोळ्यासंग्रह
#Abhisarika – काव्यसंग्रह
#Counselor
#Nutritionist

