नांदेड ( दिगांबर वाघमारे )…
येथील नांदेड अभिवक्ता संघ जिल्हा नांदेड च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.एल.बी. इंगळे हे अहिल्याबाई होळकर यांच्या राज्यकारभारा विषयी विचार मांडताना असे म्हणाले की, भारतातील मराठा माळवा साम्राज्यांची महाराणी अहिल्याबाई होळकरांनी लोककल्याणकारी राज्य व्यवस्था बळकर करण्यासाठी शासन प्रशासन गरीबाच्या कल्याणासाठी राबवून सामान्य आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक योजना राबविल्या तसेच सतीची चाल बंद केली, विधवा विवाहास मान्यता दिली.. त्या भारतीय मराठ्यांच्या इतिहासात एक न्यायप्रिय आदर्श राज्यकर्त्या म्हणून इतिहासात विशेष उल्लेख केला जातो. आजच्या राज्यकर्त्यांनी अहिल्याबाई होळकरांच्या उत्तम राजकारभारांचा व न्यायव्यवस्थेचा आदर्श घेणार आहेत का?… असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध विधी तज्ञ ॲड .शंकरराव कापसे, नांदेड अभिवक्ता संघाचे कार्यक्षम अध्यक्ष अँड. आशिष गोदम गावकर, तसेच जिल्हा सरकारी वकील आदरणीय अँड. रणजीत देशमुख यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली… तसेच अँड. डि.के. हंडे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले… कार्यक्रमाच्या आयोजन ॲड. माणिकराव वाखर्डे व सूत्रसंचालन ॲड. रामा काकडे यांनी केले आहे.. कार्यक्रमासाठी ॲड. व्यंकटेश गोळेगावकर, ॲड.रमा धमपलवार यांची खास उपस्थिती होती.. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. हनुमंत नरंगले, ॲड. नामदेव गाढवे, यांनी सहकार्य केले… कार्यक्रमाला वकील बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला..


