मेनोपॉज ( रजोनिवृत्ती) काळात मित्र किती महत्वाचे..
रजोनिवृत्ती हा स्त्रीचा नाजूक काळ ज्यातून प्रत्येकीला जावं लागतं.. कोणाला कमी त्रास होतो, कोणाला होतनाही , काही जणीना जीव नको होतो , काही जणीना गर्भाशय काढावं लागतं तर काहीना अजून काही.. वजन वाढणं , मुडबदल , गर्भाशयाला फिब्रॉइड गाठी येणं. मासिकपाळी ( सखी )कधीही येणं , ब्लीडींग होणं , चिडचिड , राग , उत्साह नस्णं , शारीरिक सुख नको वाटणं , पुरुषांचा स्पर्श नको वाटणं एक ना अनेक गोष्टी..पूर्वीही व्हायचा त्यावेळी एकत्र कुटुंब होती त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीची गरज भासली नाही..
अशावेळी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने स्त्रीला समजून घेणं गरजेचं असतं.. तिची ही नाजूक स्टेज खुप कमी काळासाठी असते ती एकदा ओलांडली कि स्त्री पुन्हा पुर्ववत होते अगदी सगळ्या गोष्टीसाठी.. पण नवरा बिझी , मुलं त्यांच्या व्यापात अशा वेळी ती स्त्री कुढत बसते आणि अजूनच दुखी होते अशावेळी तिला मित्र नसले किवा ती आयडल असली तर मग तिचं मानसिक खच्चीकरण होतं त्यानंतर तिला आजारी असल्याचा फिल येतो आणि सगळच बिनसतं पण याउलट माझ्यासारखी स्त्री जी असंख्य पुरुषांच्या गराड्यात असते आणि रजोनिवृत्तीमधे ते तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात तेव्हा मात्र नशीब आणि भाग्यवान या शब्दांचे अर्थ कळतात..
गेली आठ महिने मीही या सगळ्यातुन जात आहे .. सचिन सोबत आहेच पण त्यासोबत आहेत ते माझे मित्र.. गर्भाशयाला आलेलं फिब्रॉइड न काढता चांगले डॉक्टर सजेस्ट केले तेही माझ्या दोन मित्रांनीच आणि माझे ऑपरेशन टळले.. ( मित्रानी गर्भाशय वाचवलं )एकाने जाऊन हॉस्पिटलमधे नंबर लावला दुसऱ्याने हॉस्पिटलमधे नेलं.. मला बरं वाटावं म्हणुन एकाने निसर्गात नेउन आणलं.. गणपती पहायला जाता येत नव्हतं म्हणुन एकाने कारमधून गणपती दाखवून आणले.. कोणी फळं आणून देतय.. कोणी अजून काही करतय .. रजोनिवृत्तीचा सुखद काळ अनुभवायला या माझ्या मित्रांनी मला इतकी मदत केली आहे कि हजारो जन्म सुध्दा मी परतफेड करु शकणार नाही.. माझा कृष्ण या सगळ्याकडून हे करुन घेत होता आणि मी लाड करुन घेत होते आणि घेत आहे.. कोणी शॉपिंगला नेउन माझा मुड बदलवत आहे तर कोणी नवीन विषय देउन माझ्याकडून लिहुन घेत आहे.. एकदाही माझा मुड बदलू दिला नाही ना त्रास होवू दिला.. मनापासून वाटतं , प्रत्येकीच्या वाट्याला हे सुख यावं आणि रजोनिवृत्ती सुखकर जावी..
सखीनो पुरूष वाईट नाही गं , मुलींच्या मनात पुरुषांबद्दल वाईट भरवुन देउ नका.. त्यांना पृथ्वीवर आपणच आणतो आणि संस्कारही आपणच करतो.. जसं आपण पेरणार तेच उगवेल .. हुंडाबंदीमधे स्त्रीच आहे.. सासूसुन द्वेष मधे स्त्रीच आहे.. पुरुषांना जन्म देणारीही स्त्रीच आहे.. त्यांना बिघडवणारीही स्त्रीच आणि त्यांच्यावर प्रेम करणारीही माझ्यासारखी स्त्रीच आहे.. मी माझ्या मित्रांवर प्रेम करते म्हणुन ते आज या काळात माझ्यासोबत आहेत आणि आनंदी हॉर्मोन तयार व्हायला त्यांचाच मोलाचा वाटा आहे..
फोटो काढणारेही तेच.. रील्स करणारेही तेच.. कमेंट्स करणारेही तेच आणि गिफ्ट देउन मला आनंदी करणारेही तेच त्यामुळे नवऱ्यावरचा लोड कमी झाला.. तोही सुखी असायला मित्रच कारणीभुत.. नवऱ्यामागे बायकोची भुणभुण नाही त्यालाही जबाबदार मित्र.. पुरूष पुरुषांचा शत्रू नाही तर स्त्री स्त्रीची शत्रू आहे.. सर्वांगाने स्त्री पुरूष क्रिएशनचा विचार करा .. सगळीकडे फक्त आनंदच दिसेल.. रजोनिवृत्ती कधी संपेल कळणारही नाही.. एका ठरावीक साच्यातून बाहेर पडून ब्रॉड व्हीजन ठेवून वागलं तर मानसिक रुग्ण होण्याची वेळ येणार नाही..
सोच बदलो.. सबकुछ बदलेगा....https://www.facebook.com/sonal.s.godbole
https://www.instagram.com/godbolesonal?igsh=Y3dvazd0Y3UzcW84
https://youtube.com/@sonalcreations2874?si=jP6Ft3TECNOcUi_n
#SonalSachinGodbole
#Reel_Master
#YouTuber
#Publishersonalcreations
#कुंपणावरचासरडाकादंबरी, #कामिनीकादंबरी, #सहजसोप्पं, #संस्कारवेल, #मुलीची आई, #नैराश्यातुनसकारात्मकता, #आईमुलगानातंसंस्कार , #सखी,
#अध्यात्मआणिगैरसमज, #एक सुंदर सत्य
#AnimalCommunicator
#SonalCreations – my YouTube channel
#SexEducation as a counselor
#ProudToBeATranswoman – book
#Beyondsex – novel
#Fantasies_And_Beauties_In_Sex – novel
#Anira – novel
#Indradhanu – book
#13000km – my life journey book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marital_affairs
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi – चारोळ्यासंग्रह
#Abhisarika – काव्यसंग्रह
#Counselor
#Nutritionist

